काश्मीरनामा - डॉ. सच्चिदानन्द शेवडे

नवचैतन्य प्रकाशन

पाने : ☀ 259 मुल्य (₹): 250.0

/media/काश्मीरनामा_kashmir.jpg

अल्प परिचय - बूकगंगा


काश्मीरमध्ये

गेली सातशे वर्षे हत्या, हद्दपारी, जाळपोळ,
लुटालूट, धर्मांतरे व बलात्काराच्या आगीत
होरपळलेल्या लक्षावधी निरपराध जीवांस...
आणि

१९४७ पासून प्रत्यक्ष युध्द व छद्मयुध्द

यांत लाख मोलाचा जीव गमावून

मातृभूमीचे रक्षण करणार्‍या अनेक
भारतीय जवानांच्या दैदिप्यमान होतात्म्यास...

'काश्मीरनामा' या पुस्तकात 'काश्मीर' या विषयाची मांडणी, 'बलिदान, संघर्ष, प्रतिकार' अशा वेगवेगळ्या अंगानी करण्यात आली आहे. 'हे पुस्तक इतिहास आणि वर्तमानाचा धांडोळा घेत भविष्याचा अंदाज बांधणारे आहे, केवळ संशोधनात्मक नाही', अशा शब्दात लेखकाने आपली या लेखामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

काश्मीरचा विषय चर्चेत राहण्यासाठी लेखन हा एक पर्याय आहे, असे लेखक मानतो आणि त्या दृष्टीने लेखकाने हे लेखन केले आहे. या पुस्तकाच्या 'बलिदाननामा' या पहिल्या भागात काश्मीरचा धगधगता इतिहास, इथले पराक्रमी राजे, काश्मीरमध्ये फोफावलेला इस्लाम आणि जिहादी चळवळ, गेल्या काही दशकातला धर्मांधतेचा काळा अध्याय इत्यादी माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

पुस्तकाच्या 'संघर्षनाम' या दुसर्या भागात शेख अब्दुल्ला यांचा उदय, 'काश्मीर छोडो ' आंदोलन, विलीनीकरण आणि माऊंटबॅटन, टोळीवाल्यांची धाड, जम्मू व लडाख वरील हल्ले, यूनोमध्ये काश्मीरप्रश्न, कलम-३७०, नवी विटी, नवे राज्य या विषयावर लेखकाने भाष्य केले आहे.'प्रतिकरनामा' या तिसर्या भागात 'रक्त आणि अश्रू', 'दहशतीचे सावट', 'कारगिलचे कुरुक्षेत्र', 'दुसर्या धर्मांतराची चाहूल' या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

द्वारा : https://www.bookganga.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.