काश्मीरनामा - डॉ. सच्चिदानन्द शेवडे

नवचैतन्य प्रकाशन

पाने : ☀ 259 मुल्य (₹): 250.0

/media/काश्मीरनामा_kashmir.jpg

काश्मीरनामा: द्वितीयावृत्तीच्या निमित्ताने... - डॉ. सच्चिदानन्द शेवडे

द्वितीयावृत्तीच्या निमित्ताने...

प्रस्तुत ग्रंथाची प्रथमावृत्ती दीड वर्षांतच संपली. अशा वेगाने आवृत्ती संपणे ही बाब लेखक व प्रकाशकाला निश्‍चितच सुखावणारी असते. हे भाग्य माझ्या बहुतेक पुस्तकांना लाभले आहे, याचा मला अभिमान आहे. अर्थात्‌ पुस्तक निर्मितीपासून विक्रीपर्यंतचे सर्व घटक याला कारणीभूत आहेत. वाचकांची उत्साहवर्धक पत्रे येत असतात.

कश्मीर असा मुळात उल्लेख व उच्चार असतीना मी शीर्षकापासून सर्वत्र काश्मीर असाच शब्द का वापरला आहे, अशी अनेकांनी पृच्छा केली. मराठी भाषेत कश्मीर, काश्मीर असे दोन्ही उच्चार प्रललित आहेत. तथापि काश्मीर असाच उल्लेख जास्त करून केला जातो. यास्तव मी सर्वत्र * काश्मीर असाच उच्चार उल्लेखिला आहे. या ग्रंथामुळे मला ' डॉक्टरेट “ मिळाली. ग्रंथलेखन चालू असतेवेळी माझे या विषयावरील व्याख्यान, पुणे येथील विद्वान संशोधक व एम. आय. टी.तील नामवंत वैज्ञानिक डॉ. र. ना. शुक्ल यांनी ऐकले. त्यांनीच मला प्रबंध लिहिण्यास भाग पाडले. ग्रंथप्रकाशनानंतर मी ते काम पूर्ण केले. ग्रंथाचा गोषवारा इंग्रजीत लिहून ' ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ' या युनेस्कोबरोबर संलग्न असलेल्या व १९८ देशात मान्यताप्राप्त असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडे ग्रंथासहित पाठविला. दि. २० ते २२ जानेवारी २००६ या काळात सदर विद्यापीठ व झोरास्ट्रीयन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वीसावे वर्ल्ड काँग्रेसचे अधिवेशन मुंबईतील रशियन कल्चरल सेंटरमध्ये पार पडले. दि. २१ जानेवारीला पदवीदान समारोह झाला. रशियन कौन्सिल जनरल श्री. अलेक्झांडर मान्तिआस्की यांच्या हस्ते पदवीदान झाले. या प्रसंगी बावीस देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशा प्रकारे काश्मीरनामा जगाच्या पाठीवर गेला... गोषवाऱ्यासहित !

काश्मीरनामाची इंग्रजी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. त्यामुळे खऱया अर्थाने वक्ता हा लेखक असण्याचा हा दुहेरी फायदा असतो. कार्यक्रमानंतर वक्‍्त्याची पुस्तके छानपैकी खपतात. काही वेळा अनेक गावांमध्ये पुस्तकाची दुकाने नसतात. तेथे पुस्तकविक्रीला उधाण येते. पुणे-नगर रस्त्यावरील आव्हाळवाडीसारख्या एका बाजूला आत असलेल्या छोट्या गावात मी नेलेली चार हजार रुपयांची पुस्तके व्याख्यानानंतरच्या दहाच मिनिटात संपली ! ! म्हणजेच लोकांपर्यंत घुस्तके नेली तर ती संपतात. मिशनरी लोक उगाच पायपीट करीत नाहीत !
वाचकबळावरच पुस्तकांच्या आवृत्त्या निघलं असतात. असाच लोभ वाचकांनी ठेवावा ही विनंती.

वन्दे मातरम्‌ !
- डॉ. सच्चिदानन्द शेवडे

द्वारा : पुस्तकातुन द्वितीयावृत्तीच्या निमित्ताने...
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.