स्टार्टअपविषयी सर्व काही

डॉक्टर अनंत सरदेशमुख

/media/स्टार्टअपविषयी सर्व काही_startup.jpeg

अल्प परिचय - हर्षल सुरेश भानुशाली

सध्याची परिस्थिती स्टार्टअपसाठी उपयुक्त एका अर्थाने रोमांचकारी सुद्धा आहे. सरकार स्टार्टअपसाठी 'स्टार्टअप इंडिया ', 'स्टॅन्डअप इंडिया' सारख्या योजना अमलात आणून स्टार्टअप्सना प्रस्थान प्रोत्साहन देत आहे आणि कधी नव्हे ते उद्योजक, सेलिब्रिटीज होत आहेत, हे टीव्हीवरील 'शार्क टॅंक' या कार्यक्रमाने दाखवून दिले आहे. याचा परिणाम म्हणजे स्टार्टअप्स सर्वत्र चर्चेचा, औत्सुक्याचा विषय झाला आहे आणि दर काही आठवड्यांनी येणाऱ्या 'युनिकॉर्न,' च्या बातम्या आपली उत्सुकता अजूनच वाढत आहेत.

असीम, आस्था यांच्या अनुभवातून अरमान, आकांक्षा यांच्याशी झालेल्या संभाषणातून या पुस्तकाचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचतो. हे माध्यम, पुस्तकाचे वाचन, आकलन सुलभ व रंजक करते. डॉक्टर अनंत सरदेशमुख यांनी या पुस्तकात सध्याच्या उद्योगांच्या अनेक गोष्टीतून, स्वतःच्या अनुभवातून केलेले लिखाण नक्कीच विश्वसनीय झालेले आहे.अनेक पुस्तकांचे, लेखांचे विस्तृत संदर्भ हे या पुस्तकाला स्टार्टअप उद्योजकांसाठी एक सहज पार्श्वभूमी उपलब्ध करून देते.

डॉक्टर सरदेशमुख यांनी स्टार्टअप विषयीची सर्व माहिती, प्रारंभ ते प्रगतीचे टप्पे यांचे विवेचन या पुस्तकात केले आहे. स्टार्टअप कसा सुरु करावा, भांडवल कसे उभारावे, प्रगती, वाढ कशी साधावी व त्यातून समर्थ, स्थितिस्थापक उद्योग कसा घडवावा याविषयीची माहिती, सूत्रे त्यांनी या पुस्तकात सादर केली आहेत.
--------------------------

मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया

स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवल उभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे ‘स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते. विषयाचे पर्यावरण, उद्योगकल्पना ते यशस्वी स्टार्टअपची प्रथम समभाग विक्री या प्रवासाची प्रत्येक पायरी, प्रत्येक अंग यांच्या मांडणीत हे पुस्तक परिपूर्ण आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ
------------------------

डॉ. सरदेशमुख यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये स्टार्टअपशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह अगदी साध्या-सोप्या भाषेत केला असून उद्योजकतेशी संबंधित सर्वांना ते अतिशय मोलाचे व मार्गदर्शक ठरेल.

डॉ. नितीन करमळकर, शिक्षणतज्ज्ञ
-------------------------

महाराष्ट्रातील व इतरत्र मराठीत रस असलेल्यांकरिता त्यांना भावेल अशा भाषेत उद्योगातील एका अनुभवी व्यावसायिकाने अगदी योग्य वेळी हे पुस्तक लिहिले आहे. त्याद्वारे उद्योजकतेतील यशाचे प्रमाण वाढीला लागेल...
डॉ. गणेश नटराजन, उद्योगपती, मेंटॉर, गुंतवणूकदार

द्वारा : पुस्तक स्टेशन