महाभारताचा मूल्यवेध - डॉक्टर रवींद्र शोभणे

विजय प्रकाशन (नागपूर)

पाने : ☀ 226 मुल्य (₹): 225.0

/media/महाभारताचा मूल्यवेध_mbl.jpg

महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन - महेश नाईक


महाभारताच्या विविध अंगांवर सुमारे दहा-बारा पुस्तकं वाचून झाल्यावर मी महाभारताचा मूल्यवेध हे डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे पुस्तक हातात घेतलं. या आधीच्या पुस्तकांनी महाभारताविषयी ची बरीच कोडी सोडवायला मदत केली होती, त्यामुळे आता काय उरलय ही भावना होतीच आणि त्याचबरोबर उरलेली कोडी हे पुस्तक सोडवेल का हा प्रश्न देखील?

डॉक्टर शोभणे यांनी याआधी महाभारतावर आधारित उत्तरायण ही कादंबरी लिहिली आहे (मी ती वाचलेली नाही) आणि या कादंबरी स्वरूपात ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टींची उकल त्यांना मांडता आली नाही त्याचा अंतर्भाव त्यांनी मूल्यवेध या पुस्तकात केल्याचे त्यांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे.
मूल्यवेध हे पुस्तक त्यांनी आठ प्रकरणांत विभागले आहे यात पहिल्या प्रकरणात महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन आहे ज्यावर इरावती कर्वेंच्या युगांत चा प्रभाव जाणवतो. तसाच तो पुस्तकातील इतर प्रकरणावर प्रकरणांवर ही जाणवतो. दुसऱ्या प्रकरणात आर्य संस्कृती चे वर्णन आहे यात मुख्यत्वेकरून वैदिक काळ, संस्कृती ,धर्मशास्त्रे, यज्ञसंस्था, वर्णव्यवस्था, कुटुंब पद्धती, विवाह संस्था, कृषी संस्कृती, व्यापार, देव आणि स्वर्ग संकल्पना, इत्यादीं बद्दल बरीच माहिती आहे

महाभारताच्या वाचकांसाठी यानंतरची प्रकरणे वाचावीशी वाटणारी आहेत. पुस्तक हळूहळू पकड घेते ते महाभारतातील पुरुष, स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये. तर शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये म्हणजेच वर-शाप, युद्धानंतर व पाऊलखुणा यात ही पकड हळू पुन्हा सुटत जाते.

महाभारतातील पुरुष, महाभारतातील स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये बरीचशी वर्णने व निष्कर्ष इतर पुस्तकांतून येऊन गेलेले आहे. डॉक्टर शोभणे देखील इरावती बाईंची युगांत मधली मते मान्य करताना आढळतात. मात्र शिखंडीनी चे शिखंडी बनणे आणि द्रौपदीच्या जन्माचे कोडे हे कोडेच राहते. इतर काही कोड्यांची जसे द्रोण, कृप , कृपी यांचा जन्म,अश्वत्थाम्याचे नामकरण, परीक्षिताची जन्मकथा, द्रौपदी वस्त्रहरण कथा, सत्यवतीची जन्मकथा यांची उकल त्यांनी व्यवस्थितपणे केली आहे त्यामुळेच डॉक्टर शोभणेंच हे पुस्तक आपल्या ज्ञानात भर घालत असले तरी विचारांना फार वेगळी दिशा मात्र ते देत नाही.

भारतीय संस्कृतीतील महाभारत हे महाकाव्य सामाजिक जीवनावर, समजात घडणार्‍या गोष्टींवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. महाभारताचा संबंध इतिहासकाळाशी जोडल्यास त्यामागील श्रद्धा, भक्तिभाव, दैवी चमत्कार,वर-शाप हे बाजूला ठेवले तर नीतिशास्त्र, तत्वज्ञान, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, मानववंशशास्त्र याचे मूल्यमापन त्या संदर्भात करता येते. तसा प्रयत्न डॉ. रवींद्र शोभणे यांनी 'महाभारताचा मुल्यवेध' मधून केला आहे. जे समाजात घडते ते महाभारतात घडते, जे समाजात घडत नाही ते महाभारतात घडत नाही, असे व्यासांनी सांगितले होते. त्याचा मुल्यवेध यात घेतला आहे.

द्वारा : https://manaasajjanaa.blogspot.com/
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.