धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे

विश्वास दांडेकर

देशमुख अ‍ॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.

/media/धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे_dk.jpg

पाने : ☀ 185 मुल्य (₹): 350.0

अभिप्राय - कुमार केतकर

महाभारताबद्दल इतक्या अभ्यासकांनी, विचारवंतानी, साहित्यिकांनी इतके काही लिहून ठेवले आहे; त्या महाकाव्यातील व्यक्तींचे मनोविश्लेषण केले आहे आणि त्या महासंघर्षाचे नाट्यमय वर्णन केले आहे, की आणखी एक चिंतनात्मक ग्रंथ कशाला वा-असा प्रश्‍न काहींना पडू शकेल; परंतु हा ग्रंथ वाचल्यावर मात्र त्या प्रश्‍नाचे उत्तर मिळेळ, अशी मला खात्री आहे.

विश्वास दांडेकर यांनी घेतलेला वेध केवळ आजच्या.काळाला अनुरूप आहे असे नव्हे तर॑ ज्याला हल्ली 'स्टॅटेजिक थिंकींग' म्हणून संबोधले जाते, त्या व्यूहात्मक विचारसरणीनुसार केलेले व काव्यफुलोरा- चमत्कार टाळून मांडलेले हे रोखठोक प्रतिपादन आहे.
व्यूहात्मक विचार' फक्त युद्धापुरता मर्यादित नसतो.
मानवी संबंधांचे जे गुंतागुंतीचे जाळे असते त्या जाळ्यातील प्रत्येकाला सतत व्यूहात्मक विचार करायचा असतो. असेही म्हणता येईल, की काळ आजचा असो वा महाभारतातला, प्रत्येक व्यक्‍तीला तिची मूल्ये आणि तिची नाती, तिच्या श्रद्धा आणि संशय,तिची समष्टी आणि आजूबाजूच्यांचे स्वभाव हे सगळे समजून घ्यायचे असते.

विश्वास दांडेकरांचे हे पुस्तक वाचून महाभारतातील प्रसंग आणि व्यक्‍ती यांवर नवा प्रकाशझोत पडतोच पण आपला समजही रुंदावतो........

आणि सखोल होतो!

द्वारा : पुस्तकातुन साभार