गर्जा महाराष्ट्र - डॉ. सदानंद मोरे

सकाळ प्रकाशन

पाने : ☀ 400 मुल्य (₹): 400.0

/media/lWAVrnkMR31g.jpg

कोणा कारणे झाले हे निर्माण? - डॉ. यशवंत सुमंत

आपलाच इतिहास आपल्याला वस्तुनिष्ठपणे माहीत नसेल तर इतिहास हे केवळ स्मरणरंजनाचे स्थळ तरी बनते किंवा निव्वळ आपापल्या हितसंबंधांचेच राजकारण करणाऱ्या गटांचे, वर्गांचे वा नेत्यांच्या हातचे साधन बनते. या अरिष्टातून विद्यमान महाराष्ट्राची त्वरित सुटका व्हावी यासाठी प्रा. सदानंद मोरे हे गर्जा महाराष्ट्र' मधून सांगत आहेत की इतिहास भावनेला हात घालत माणसाला उन्मादी बनवणारा तसेच तो केवळ जोखड बनता कामा नये. तर तो माणसाला उत्तरोत्तर विवेकी, पोक्त, निर्भय आणि इतरांच्याही कार्यकर्तृत्वाची दखल घेणारा, त्याचा आदर व कदर करणारा ऊर्जास्रोत बनला पाहिजे. तरच द्वेषमूलक आणि सूडबुद्धिजन्य इतिहासवादापासून आपली सुटका होईल. लोकशाहीला प्रगल्भ, आशयघन आणि निकोप करण्यासाठी आज त्याची गरज आहे.
- डॉ. यशवंत सुमंत

द्वारा : पुस्तकातुन
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.