मोबाईल फोन व टाॅवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि उपाय

मिलिंद बेंबळकर , सुरेश कर्वे

/media/emr-issue.jpg

बायोइलेक्ट्रोमॅग्नेटिक्स या विषयातील हे पहिलेच मराठी पुस्तक - टिंब.in

मोबाईल फोनचा वापर करीत नाही अशी व्यक्ती विरळच!

सगळीकडे मोबाईल टॉवर्स उभे राहिलेले दिसतात. त्यामधील अधिकांश टॉवर्स हे अनधिकृत आहेत. मोबाईल फोन, मोबाईल टॉवर, टॅब, वाय- फाय इ. वायरलेस उपकरणांमधून उद्भवणाऱ्या रेडिएशनबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये अज्ञान आहे. हा विषय सर्वसामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या पिढ्यांच्या आरोग्याशी निगडित आहे.

३१ मे २०११ रोजी आय. ए. आर. सी. (इंटनॅशनल असोसिएशन फॉर रिसर्च व कॅन्सर, जागतिक आरोग्य संघटनेची उपशाखा ) यांनी "इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन " (मोबाईल फोन, मोबाईल टॉवर इ. पासून होणारे वायरलेस रेडिएशन ) यास class 2B कॅन्सरकारक गटामध्ये समाविष्ट केलेले आहे.

त्यानंतर जगातील सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये याविषयी भरपूर संशोधन झालेले आहे आणि होत आहे. त्यामधये असे आढळून आलेले आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीराच्या जवळजवळ सर्व प्रणालींमध्ये रोग होतात. उदा. निद्रानाश, डोकेदुखी, थकवा, नपुसंकत्व, वांझपणा, हृदयरोग, कॅन्सर इ.

मोबाईल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि घ्यावयाची काळजी या पुस्तकामध्ये रेडिएशन संबंधित सरकारी मानके ही कशी कुचकामी आणि कालबाह्य आहेत याविषयी विवेचन केलेले आहे व असे दाखववून दिलेले आहे की, या तथाकथी त सरकारी मानकांच्या कितीतरी खालच्या पातळीवर होणाऱ्या रेडिएशन जीवनशास्त्रीय दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे हि सुरक्षा मानके जीवनशात्रीय दुष्परिणाम लक्षात घेऊन अधिक सक्षम करावी लागतील.

श्री. सुरेश कर्वे, श्री मिलिंद बेंबळकर यांनी या विषयावरील संशोधन लेखांचा ८ ते १० वर्ष अभ्यास करून मराठी वाचकांसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. बहुधा बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स या विषयातील हे पहिलेच मराठी पुस्तक असावे. सध्या जे लोक वायरलेस उपकरणांच्या (मोबाईल फोन, टॅब इ. ) आहारी गेलेले आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि जीवनरक्षक ठरेल हे निश्चित.

मोबाईल फोन रोज फक्त ६ मिनिटे वापरासाठी बनविलेला आहे. परंतु आपण रोज किमान ३ तास मोबाईल फोनचा वापर करीत असतो. लहान मुले, विद्यार्थी यांना सतत मोबाईल फोन बघण्याची सवय लागते. त्यास स्क्रिन अ‍ॅडिक्शन असे म्हणतात. रोज एका पेक्षा जास्त वेळेस सेल्फी काढावीशी वाटणे यास सेल्फायटिस हा आजार झालेला आहे असे समजले जाते.

विद्यार्थ्यांना सतत मोबाईल फोन वापरण्याची सवय लागल्यामुळे त्यांचा लिखाणाचा वेग कमी होत आहे. सांगितलेले ऐकल्यामुळे साधारणतः २५% लक्षात राहते. वाचनामुळे ३५% लक्षात राहते. वाचून लिहिण्यामुळे ८५% लक्षात राहते असे शिक्षणतज्ञांचे मत आहे. साधारणतः १० बी मधील विद्यार्थ्याच्या लिखाणाचा वेग ५० शब्द प्रति मिनीट असावा (५ वीच्या विद्यार्थ्याचा २५ शब्द प्रति मिनीट असावा). तसेच १० बी मधील विद्यार्थ्याचा आकलनासह वाचनाचा वेग ४०० शब्द प्रति मिनीट असावा. मोबाईल फोनच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कमी होते. त्यांच्या शरिरामध्ये 1harmonal imbalance होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये आशा -निराशेचे तीव्र चढउतार निर्माण होतात.

जगभरात या समस्येला सामोरे जाण्यासाठी विविध पालक संघटना, शिक्षक संघटना मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे असतात तसेच काही मर्यादा पण असतात. त्याची जाणीव ठेवून मोबाईल फोन, टॅब, वाय-फाय यंत्रणा व मायक्रोवेव्ह ओव्हन इ. चा वापर केला पाहिजे.

पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

१. bookganga.com, amazon.in
२. रसिक साहित्य, आप्पा बळवंत चौक, पुणे - ४११००२ (९८२३० ५४५२० / ०२०- २४४५ ११२९)
३. उज्वल ग्रंथ भांडार, आप्पा बळवंत चौक, पुणे - ४११००२ (०२०-२४४६ २२६८)
४. साधना ग्रंथ प्रदर्शन आणि मिडिया सेंटर, ४३१ शनिवार पेठ, पुणे- ४११०३० (०२०-२४४५ ९६३५)
५. उत्कर्ष बुक सर्व्हिस, गरवारे पुलाजवळ, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४ (०२० - २५५३ २४७९)

द्वारा : पुस्तकातुन साभार