पक्षी, पशु, आणि डाकू - मूळ लेखन - कृपाकर आणि सेनानी | अनुवाद - शुभदा पटवर्धन

मनोविकास प्रकाशन

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 160.0

/media/1Yqe1l8rGXGC.jpg

कृपाकर आणि सेनानी या वन्यजीव छायाचित्रकारांचे अपहरण आणि सुटका - उमा निजसुरे

८ ओक्टो १९९७ रोजी बंदीपूर येथील घरातून कृपाकर आणि सेनानी यांचे अपहरण होते आणि १४ दिवसांनी त्यांची सुटका होते. या १४ दिवसात काय घडते ते या पुस्तकात आहे. वीरप्पनची अशी समजूत होते कि हे दोघे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना ओलिस धरून खंडणी आणि माफी या दोन गोष्टी वसूल करण्याचा त्याचा डाव होता. वीरप्पन नि त्याचे साथीदार या दोघांना घेऊन जंगल तुडवत राहतात. मधेच अजून ४ जणांना ओलिस ठेवले जाते .
या १४ दिवसांच्या प्रवासात या दोघांना विरप्पनचे क्रौर्य आणि चातुर्य तर दिसतेच पण त्याचे वनस्पती आणि प्राणीजगताबद्दलचे सखोल ज्ञानही दिसून येते. प्राण्यांचे वर्तन, त्यांची चाल, त्यांची भाषा यांची हुबेहूब नक्कल वीरप्पनला करता येत होती. वन्य पशू पक्षांचा त्याचा अभ्यास दांडगा होता. त्याच्याकडे अनुभव कथांचा मोठा साठ होता आणि त्यातल्या अनेक मंत्रमुग्ध करणाऱ्या कथा कृपाकर आणि सेनानी यांनी ऐकल्या.

याचाच फायदा घेत कृपाकर आणि सेनानी यांनी त्याला वन्य जीवन आणि पर्यावरण या विषयावर बोलतं करण्याचा प्रयत्न केला आणि स्वताची सुटका करण्याचा विषय काढायला सुरवात केली. वीरप्पन आणि त्याचे साथीदारयांचे जग आणि कृपाकर, सेनानी यांचे जग यात फरक असूनही या १४ दिवसात अपहर् त आणि अपहरणकर्ते यांच्यात एक सेन्ह्बंधन तयार झाले. शेवटी वीरप्पनला पटवण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांची सुटका झाली.

जंगलातील अनेक आश्चर्यकारी गोष्टी, जंगलात होत असणारी तस्करी, चकमकी यांचे वर्णन या पुस्तकात दिसते. प्राणावर बेतलेले असतानाही कृपाकर सेनानी हे सतत विरप्पनशी स्नेहभाव ठेवतात, त्याच्याशी गप्पा मारतात, त्याचे पूर्वायुष्य जाणून घेतात, सरकारला शरण जाण्याचा सल्ला देतात. आणि सर्वात शेवटी स्वताबरोबरच इतर ४ जणांचीही सुटका करून घेतात. गंभीरपणे पुस्तक न लिहिल्यामुळे आणि अधेमधे विनोदी लिखाणामुळे त्यांच्या अपहरणाची कहाणी न वाटता ते विरप्पन बरोबर केलेल्या जंगलातील सहलीचे वर्णन आहे कि काय असे वाटते. त्यामुळे वाचताना मौज येते.

आता थोडेसे या पुस्तकाच्या लेखकांविषयी. कृपाकर आणि सेनानी हे नामवंत वन्यजीव छायाचित्रकार असून त्यांनी काढलेली हजाराहून अधिक छयाचित्रे natural हिस्ट्री मागेझीन, जिओ, बीबीसी लंडन आणि लंडन टाईम्स यासारख्या जगन्मान्य नियतकालिकात अंतर्भूत केली गेली आहेत. त्यांच्या "The Pack" या फिल्मला "ग्रीन ऑस्कर २०१०" हा पुरस्कार प्राप्त झाला असून असा मन मिळवणारी हि पहिली आशियायी फिल्म आहे.

'पशू पक्षी आणि डाकू ' हे पुस्तक म्हणजे कुप्रसिध्द डाकू आणि त्याच्या टोळीबरोबर आलेल्या अनुभवांचे चित्रण आहे. मराठीत शुभदा पटवर्धन यांनी त्याचा उत्तम अनुवाद केलेला आहे आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेले मुखपृष्ठ बघण्यासारखे आहे.

द्वारा : पुस्तकासाठी संपर्क - पुस्तक स्टेशन - हर्षल भानुशाली ९६१९८०००३०
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.