तोत्तोचान

तेत्सुको कुरोयानागी, चेतना सरदेशमुख गोसावी

नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया

/media/F4GmX4SDUqzL.JPG

पाने : ☀ 130 मुल्य (₹): 100.0

तोत्तोचान( खिडकीतली मुलगी) - विजुभाऊ

एक लहान मुलगी वय वर्षे कदाचित पाच. शाळेत अत्यंत अस्थीर . वर्गात येणार्‍या चिमण्याशीच बोलणे, वारंवार डेस्क उघडणे, वर्गाच्या खीडकीतून रस्त्यावरून जाणार्‍या बॅन्डवाल्यांशी बोलणे वगैरे वगैरे.... हे तिचे सततचे उद्योग. तिच्या या उद्योगाना कंटाळून शाळेतून मुलीचे नाव काढून टाकले. या छोटीला त्याची कल्पनाच नाही.
ती आणि तिची आई तोमोई नावाच्या एका शाळेत जातात .ही शाळा रेल्वेच्या डब्यात भरत असते.
मुख्याध्यापक या मुलीला काहीतरी बोल असे सांगतात. आणि ती तब्बल तीन तास मुख्याध्यापकाना निरनिराळ्या गोष्टी सांगत असते.
मुख्याध्यापक कोयाबाशी तीला म्हणतात तू खरोखरच एक छान मुलगी आहेस. ( हे वाक्य तोत्तोचानच्या आयुष्यात खूप काही देऊन जाते)
तोमोई शाळेचे वर्ग रेल्वेच्या डब्यात भरत असतात. अमूक तुकडी वगैरे असे काही नाही. ज्याला जे शिकायचे ते त्याने हव्या त्या वेळी शिकायचे. फक्त दिलेला अभ्यास दिवसाअखेरीस संपवायचा. हा एकमात्र नियम
तेत्सुको... तोत्तोचान त्यानन्तर शाळेतील काही अनुभव लिहिते. ते तिने तिच्या भाषेतच लिहिले आहेत.
पाच वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून जग पहाणे हा एक वेगळाच अनुभव आपण घेत असतो.
शाळेतले जग सुरुवातीचे जग फुलपंखी अनुभवांचे आहे. लहानगी तोत्तोचान तिच्या आईकडे रोलमॉडेल म्हणून पहात असते. शाळेला काहीतरी गाणे हवे असा तिचा आग्रह. इतर शाळांतल्या मुलाना त्यांच्या शालेतली गाणी पाठ आहेत. आपल्या शाळेला गाणेच नाही. मग तीच एक गाणे रचते
खूप छान शाळा
आतून बाहेरून खूप मोठी शाळा.
ते गाणे गाता गाता इतर मुलेही एकमेकांचे हात धरून गाणे गाऊ लागतात आणि सर्वजण एका बंधाने बांधले गेल्याचा अनुभव तोत्तोचानबरोबर आपल्यालाही येतो.
जेवणात काय आणायचे तर काहीतरी जमिनीवरचे आणि काहीतरी समुद्रातले आणायचे इतक्या सोप्या शब्दात चौरस आहाराची व्याख्या.
ट्रीपला गेल्यावर समुद्रातल्या गरमपाण्याच्या प्रवाहाची गम्मत.
तोमोई शाळेतली काही मुले शारीरीक व्यंग असलेली. स्पास्टीक अशी होती
पोहोण्याच्या तलावात मुलांना आपल्या शरीराची लाज वाटू नये म्हणून पोहोण्याचा पोषाख न घालता पोहोण्याचा अनुभव....
कोणी वरून पाहिले असते तर पोहोण्याचा तलाव बोरानी भरून गेलाय असेच दृष्य दिसले असते.
त्यामुलांच्यात काही व्यंग आहे हे कोणाच्या खिजगणतीतही नसायचे.
पोलीओ मुळे पायातले त्रान गेलेल्या एका मुलाला तोत्तोचान त्यालासुद्धा झाडावर चढण्याची मजा अनुभवायला मिळावी म्हणून झाडावर चढवते तो अनुभव.... आपल्यातच बदल घडवत असतो.
शाळेतला शिपाई युद्धावर जायला निघतो त्यावेलेस शाळेतली मुले त्याचा निरोपसमारंभ करतात. आणि त्यानन्तरही कित्येक दिवस खोटखोटा निरोपसमारंभ करत असतात.
आरोग्य पहाण्यासाठी झाडाची साल तोत्तोचान सर्वाना चाखायला लावते. तिच्या कुत्र्याला देखील
खेळताखेळता कुत्रे चुकून तीला चावते स्वतःला झालेल्या जखमेपेक्षाही तोत्तोचानला कुत्र्याला आईवडील रागवतील हीच चिंता असते.
जेवताना म्हणायचे तिचे साधेसे गाणे
बत्तीस वेळा चावून खावा
प्रत्येक घास जेवताना
हे गाणे तिला घरीसुद्धा म्हणावेसे वाटते

घराजवळ दिसणार्‍या तिच्याच वयाचाअ एक मुलगा तीला अडवून "कोरीयन" ( कोरीयन युद्धामुळे जपानमध्ये आलेले निर्वासीत) अशी शिवी देतो. तोत्तोचान सुरुवातीला घाबरते पण कोरीयन म्हणजे काय हे कळाल्यानन्तर तीला त्या मुलाबद्दल वाईट वाटू लागते.

आइस स्कीईंग करणारा माणूस जेंव्हा तोत्तोचानला आदराने वागवतो तेंव्हा ते तीला काहीतरी ग्रेट वाटते.
तीच्या वेण्या ओढल्या म्हणून वर्गातील मुलाना "मुलींशी असे वागायचे असते का?" असे विचारतात तेंव्हा ते त्या मुलाला आणि तोत्तोचानला सुद्धा काहीतरी वेगळेच वाटते
युद्धाच्या काळात खाऊच्या गोळ्या देणार्‍या मशीनमध्ये उगाचाच नाणे टाकून त्यातून कधीतरी गोळ्या येतील म्हणून वाट पहाणारी तोत्तोचान.
शाळेत नवा वर्ग अर्था नवा रेल्वेचा डबा येणार असतो त्यावेळेस रेल्वेचा डबा शाळेत कसा आनतात ते तिला पहायचे असते . सर्वच मुलाना ते कुतुहल असते. मुख्याध्यापक त्यासाठी सर्वाना शाळेत रहायची परवानगी देतात. आणि मुले मध्यरात्री ते पहातात.
शाळेत अपंग मुलाना भाग घेता यावा म्हणून तशा स्पर्धा घेतल्या जातात.
स्पर्धेत बक्षीसे म्हणुन मुलांनी शाळेच्या बागेत लावलेली भाजी देतात. मुले अभिमानाने बक्षीस मिळालेली भाजी घरी घेऊन जातात.
असे अनेक अनुभव तेत्सुकोने पुस्तकात लिहिले आहेत.
तोत्तोचान पुस्तकाबद्दल खूपकाही लिहावेसे वाटते. हे पुस्तक केवळ वाचन अनुभव नाही तर छोट्या मुलांच्या नजरेतून जग पहाण्याचा अनुभव आहे
तू खरोखरच एक छान मुलगी आहेस हे वाक्य आपल्यालासुद्धा खूप काही शिकवून जाते.
आपण मुलाशी बोलताना त्याना रागवताना मुलांना नकळत तू मठ्ठ्च आहेस ढ आहेस किंवा तू असा वेंधळाच आहेस.
धांधरट आहेस अशी लेबले लावत असतो. मुलेही त्यांच्या नकळत त्या ती दूषणे स्वीकारत असतात. त्यांचा आत्मविष्वास खच्ची होत असतो.
तोत्तोचान हे पुस्तक जगातल्या बहुतेक सगळ्या भाषेत अनुवादीत झाले आहे. तेत्सुकोला अनेक वाचकांची पत्रे येतात.
" मला तुझ्या सारखी आई असते आणि कोयाबाशीं सारखे शिक्षक असते तर मी अशी जेलमध्ये गुन्हेगार म्हणून आले नसते" ही तिच्या एका वाचकाची प्रतिक्रीया बोलकी आहे.

सहज म्हणून कोणीतरी हे पुस्तक मला भेट दिले.
पुस्तकातली चित्रे पाहुन हे पुस्तक लहान मुलांसाठी असेल असे वाटले.पण प्रत्यक्षात काही वेगळेच होते. ज्वलंत चित्रण. समस्या, विदारक अनुभव थरारक. बुद्धीला सतत आव्हान देणारे रहस्य ...असे काहिही नसताना तोत्तोचान आपल्याला भारून टाकते. साध्या सोप्या शब्दात कोणतीही बौद्धीके न पाजता प्रगल्भ करून जाते.
"तारे जमीन पर" चित्रपट पहाताना हे पुस्तक वारंवार आठवते.
Every Child is a special child" आणि "तू खरोखरच एक छान मुलगी आहेस" हे फार काही वेगळे वाटत नाही.

तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ (?) शिक्षकांसाठी पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्‍व, तिचे पालक, लाडकी "तोमोई' शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्‍वास...हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं "तोत्तोचान.' (मूळ लेखिका : तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद : चेतना गोसावी)
कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत निसर्ग, चित्रकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे.
तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, गमती आपल्या शिक्षणपद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही शिक्षणासंबंधी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक!

द्वारा : http://misalpav.com/