घर हरवलेली माणसं

वसंत पुरुषोत्तम काळे

मेहता पब्लिशिंग हाऊस

/media/gharnahivpk.jpg

पाने : ☀ 182 मुल्य (₹): 170.0

अल्प परिचय - वसंत पुरुषोत्तम काळे

मुंबईमारख्या शहरात राहून आपलं रोजचं आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय माणसांची होणारी

कुचंबणा या कथांमधून मांडलेली आहे.

चाळीतलं वास्तव्य, लहान जागा याबरोबरच विसंवादाचे उठणारे सूर यानं

माणसाचं जीवन अवघड करून टाकलं आहे. आयुष्याचं संगीत तीन स्वरात विभागलेलं बालपण,
तारुण्य आणि वार्धक्य.

सर्वाधिक उमलण्याचा, फुलण्याचा, उत्कटतेचा काळ तो तारुण्याचा. भरीराचे, मनाचे, भावनांचे,
संवेदनांचे, कर्तृत्वाचे सगळे उत्सव बहराला येण्याचा काळ. पण तारुण्यातच अनेक प्रकारच्या
कुचंबणेनं माणसाचं आयुष्य बांधून टाकले.

अनेक संसारातून यामुळं उठलेले विसंवादाचे सुर, हे अस्वस्थ करणारे, जखमी करणारे.
पाचशे स्क्वेअर फूटच्या घरात १० माणसं राहतात. त्यांच्यातले नाते संबंध, पतीपत्नीला हवा
असलेला एकांत, स्वस्थपणा. ही अप्राप्य गोष्ट.

आणि त्यासाठी असे क्षण खेचून घेणं म्हणजे सगळीच विटंबना. रोजच्या नित्यकर्मासाठी करावी
लागणारी रोजची धडपड हे सर्व कीव आणणारं आहे.

अनंत प्रश्न उभे करणारे आहे. अशा अनेक प्रश्नांच्या या कथा.

प्रत्येकाला आपल्या वाटणाऱ्या. . .

द्वारा : पुस्तकातुन साभार