आहार हेच औषध

माधव चौधरी

नवनीत एज्युकेशन (इंडिया) लि

/media/Q9iyJxICt70i.jpg

पाने : ☀ 400 मुल्य (₹): 200.0

ऋतूनुसार आहार - निरोगी जीवनाची गुरुकिल्ली - माधव चौधरी

“निरोगी जीवन हेच खरे सुख' या उक्तीप्रमाणे ज्यांचे शरैर बलवान असेल, निरोगी असेल, ज्यांच्या शरीरयंत्रणेत कसलाही बिघाड नसेल व ते आपले कार्य उत्तम प्रकारे पार पाडीत असेल असे लोक सुखी समजावेत. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌' असे म्हणतात ते काही खोटे नाही.

आपल्या शरीरातील पेशींची रात्रंदिवस झोज होत असते. आहारामुळेच नवीन पेशी निर्माण होत असतात. तसेच शारीरिक बळ, बुद्धी व तेज या गोष्टीदेखील आहारमुळेच प्राप्त होत असतात. यासाठी प्रत्येक व्यक्‍तीने आपल्या दैनंदिन आहाराविषयी माहिती करून घेऊन शरीर निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना आहारासंबंधी, स्वच्छतेसंबंधी व घरगुती औषधांसंबंधी योग्य माहिती पुरविली तर त्यांचे आरोग्य सुधारण्यास व त्यांचा औषधोपचारांवर होणारा अनाठायी खर्च वाचण्यास खूपच मदत होईल यात शंका नाही; म्हणूनच 'आहार हेच औषध' या पुस्तकात आम्ही अन्नधान्य व आहार, कडधान्ये, गरम मसाले, फळभाज्या, पालेभाज्या, फळे इत्यादींविषयी सुक्ष्म माहिती दिली आहे. या पुस्तकद्‌वारे लोकांनी आहारविषयक सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून घेऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतली, तर माझे श्रम सार्थकी लागल्याचे समाधान मला मिळेल.

कफातून तमोगुण, बायूतून रजोगुण आणि पित्तातून सत्त्वगुण निर्माण होतो. समप्रकृती सर्वश्रिष्ट असते. शगैरातील धातू सम प्रमाणात असतील, तर ती समप्रकृती समजाबी. समप्रकृती असणारा मनुष्य कधी कोणाचा द्वेष करीत नाही, चोरी करीत. कोणावर रागावत नाही, कधी खोटे बोलत नाही व कधी गर्वही करीत नाही. सारांश, तो दैवी गुणांनी युक्त असतो.

शरीरातील धातूंचे सम प्रमाण हे आरोग्य व धातूंचे विषम प्रमाण हा रोग होय. वात, पित्त, आणि कफ या त्रिदोषांमुळेच शरीरात रोग उत्पन्न होतात. या तिन्ही दोषांचे सम प्रमाण मनुष्याला निरोगी जीवन देते, तर त्यांचे विषम प्रमाण मानवी शरीरात रोगाचा प्रादुर्भाव उत्पन्न करते. शरीराचे नुकसान करणाऱ्या आहाराने या दोषांचा प्रकोप होऊन रोग उत्पन्न होतात.

रस, रक्‍त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि वीर्य (शुक्र) हे मानवी शरीरातील सात धातू आहेत. यांपैकी जो धातू कमी होईल तो वाढेल अशा आहाराचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. शरीरातील रसधातू कमी झाला असेल तर दूध प्या. रक्‍त कमी झाले असेल तर मिरे घालून धारोष्ण दूध घ्या. मांस कमी झाले असल्यास दूध व तूप खा. मेद कमी झाला असल्यास लोणी खा, इत्यादी.

शरीयत वात, पित्त आणि कफ यांचे प्रमाण बाढले तर वृद्धीचा दोष निर्माण होतो व घटले, तर र्‍हासाचा दोष निर्माण होतो. यास्तव वृद्‌धीचा दोष निर्माण झाला कौ तो कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि र्‍हासाचा दोष निर्माण झाला को ते प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे शरीरात वात, पित्त आणि कफाची समानता टिकवून ठेवता येईल.

वात (वायू) हा शीत, हलका, सूक्ष्म, चलायमान, खडबडीत व रुक्ष असतो. या गुणांच्या विगेधी गुण असणारा आहार घेतल्याने विकृत वायूचे शमन होते. जसे एरंडेल, तेल, लसूण, इत्यादी.

पित्त हे चिकट, गरम, प्रवाही आंबट आणि तिखट असते. या गुणांच्या विरुद्ध गुण असणारा आहार घेतल्याने बिघडलेल्या पित्ताचे शमन होते. उदा. गाईचे तूप.

कफ हा अतिशय थंड, मृदू, स्निग्ध, मधुर, स्थिर व चिकत असतो. या गुणांच्या विरोधी गुण असणारा आहार घेतल्याने कफाचे शमन होते. उदा., सुंठ.

मधुर, आंबट, खारट, कडू, तुरट व तिखट हे सहा रस आहेत. कोणत्याही आहारात किंवा पेयात या सहा रसांपैकीच काही रस असतात. मात्र या सहा रसांचे गुण, वीर्य, विपाक व प्रभाव यांची माहिती करून घेतल्याने व त्याप्रमाणे आचरण केल्यानेच सर्व रोग दूर होतात.

वायूचा दोष वाढला तर गोड, आंबट आणि खारट रस असणारा आहार घ्यावा. पित्ताचा दोष वाढला तर कडू, तुरट व गोड रस असणारा आहार घ्यावा. तसेच कफदोष वाढला तर तुरट, तिखट व कडू रस असणार आहार घ्यावा म्हणजे वाढलेल्या दोषांचे शमन होते.

वायू, पित्त, कफ, वातपित्त, पित्तकफ, कफवात व समप्रकृती अशा सात प्रकारच्या मनुष्याच्या प्रकृती असतात. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते. निसर्गदत्त प्रकृती बदलणे फार कठीण गोष्ट आहे; परंतु ती हळूहळू बदलता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागतात. प्रकृती बदल्याच्या कामी आहार फार मोठे कार्य करीत असतो.

तुम्हांला जर समप्रकृती बनवायची असेल तर-स्वास्थ्यविषयक नियमांचे पालन केले पाहिजे. दोषसंचय झाला असेल तर शोधनाने तो दूर केला पाहिजे. वात, पित्त, किंवा कफ वाढणार नाही या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे. वायू वाढला तर बस्तीचा उपयोग करावा. पित्त वाढेल तर विरेचन घ्यावे व कफ वाढला तर उलटी करावी.

प्रत्येक मनुष्याने स्वत:च्या प्रकृतीला मानवेल असा समतोल, पोषक व सात्त्विक आहार घेतला पाहिजे.

समतोल व पोषक आहाराच्या मुख्य घटकांत नत्रज (प्रोटीन), शर्करा (स्टार्च),चरबी (फेट), जीवनसत्त्वे (व्हिटेमिन्स) व पाणी या गोष्टींचा समावेश होतो.

प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱया आहारापेक्षा दहा टक्के कमी आहार घेतला पाहिजे. स्वच्छ पाणी, ताक किंवा दूधही घेणे आवश्यक असते. त्या त्या ऋतूत होणारी फळेही यथाशक्ती खाल्ली पाहिजेत.

प्रत्येक ऋतूचे हवामान वेगवेगळे असल्याने शरीरावर त्याचा वेगवेगळा परिणाम होतो. यास्तव आहारातही आवश्यकतेप्रमाणे फेरबदल केले पाहिजेत. तसे केल्याने त्या त्या ऋतुत शरीराची प्रतिकार करण्याची उर्जा टिकून राहते.

थंडीमध्ये जठराग्नी प्रदीप्त होत असतो, यास्तव आहारात मधुर व स्निग्ध पदार्थ घेतले पाहिजेत. शक्‍तीचा संचय करण्यासाठी थंडीमध्ये दूध, तूप आणि पाक (रसायने) अधिक प्रमाणात घेतले पाहिजेत. आवळे, बोरे, ऊस, येमेये, बांगी, मुळ्याच्या शेंगा, पालकाची भाजी व फळे यांचे भरपूर सेवन केले म्हणजे शरीर धष्टपुष्ट व उत्साही राहते.

उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर तापाने हवेत अधिक उष्णता निर्माण होत असते. त्यामुळे शरीरात साठलेला कफ पातळ होऊ लागतो. यास्तव फाल्युन महिन्याच्या सुरुवातीपासूनच लाह्या, चणे, कोरडी पोळी किवा भाकरी असा रुक्ष आहार घेतला पाहिजे. उन्हाळ्यात 'पित्त विदग्ध झाल्याने जठयग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे भूक कमी लागते, आहार पचणे सहजशक्य नसते. त्यामुळे जुलाब, उलटी यांसारखे रोग उद्‌भवतात. अशा वेळी आहार कमी घ्यावा व लिंबू, ताक, दही, कच्ची कैरी यांचे सेवन करवे. गूळ घालून सरबत घ्यावे. यामुळे तब्येत चांगली राहते, शरीरातील उत्साह टिकून राहतो व दैनंदिन कार्ये चांगल्या प्रकारे पार पाडता येतात.

उत्तम, समाजोपयोगी पुस्तके समाजाला स्वस्त दराने पुरविण्याचा संकल्प केलेल्या *गाला पन्लिशर्स'चे मालक श्री. शांतिभाई गाला यांनी माझे ' आहार हेच औषध' हे पुस्तक प्रकाशित केल्याजद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या पुस्तकाची छपाई सर्वांगसुंदर होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल श्री. भोगीलाल भावसार यांचाही मी आभारी आहे.

- माधव चौधरी

द्वारा : पुस्त्कातुन साभार