निर्बाचित कलाम

तस्लिमा नसरीन

मेहता पब्लिशिंग हाऊस

/media/e4KJDfZzDZu0.jpg

पाने : ☀ 237 मुल्य (₹): 150.0

निर्बाचित कलाम - आशुतोष गं जोगळेकर

मूळ बंगाली लेखिका-तस्लिमा नसरीन
मराठी अनुवाद-मृणालिनी गडकरी
बंगाली प्रकाशक-आनंद पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड कलकत्ता
पुस्तकाच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या गद्य आणि पद्यलेखनाला बांगलादेशात खूप लोकप्रियता लाभली. कवितासंग्रहांच्या हजारो प्रती काही महिन्यात खपल्या. त्यांच्या स्त्रियांविषयी वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.

उच्चभ्रू वर्गातल्या स्त्रिया उत्तम इंग्रजी बोलतात. घरात इंग्रजीतच संवाद साधतात. निम्न वर्गातल्या स्त्रियांप्रमाणे त्यांच्यावर कपड्यांची फारशी बंधने नसतात. त्या फॅशनेबल कपडे घालतात पण त्या खरंच मुक्त असतात का की ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची गुलामी असते? असे प्रश्न लेखिका वाचकांसमोर ठेवते.
बांगलादेशात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते पदावर दोन स्त्रियाच आहेत. दोन स्त्रिया सर्वोच्च स्थानी गेल्या म्हणजे बांगलादेशातल्या सरसकट सगळ्या स्त्रिया स्वतंत्र झाल्या का हा प्रश्न लेखिकेला पडतो. आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या स्त्रिया सुद्धा स्वतःच्या कर्तुत्वावर तिथपर्यंत पोचलेल्या नसून त्या कुणाची तरी मुलगी किंवा कुणाची तरी पत्नी म्हणूनच तिथे पोचलेल्या आहेत याकडेही त्या लक्ष वेधतात. पाकिस्तानात स्त्री पंतप्रधान बनू शकते पण राष्ट्रपतीपदावर मात्र ती शकत नाही कारण ते धर्माला मंजूर नाही. गाईला कालवड झाली तर घरात आनंद पसरतो पण बाईला मुलगी झाली तर मात्र तो आनंद दिसत नाही. बांगलादेशची निर्मिती होत असताना बंगाली भाषा ही बांगलादेशवासीयांची अस्मिता होती. पाकिस्तान पासून वेगळे झाल्यानंतर मात्र त्यांना इस्लाम महत्त्वाचा वाटू लागला. आत्तापर्यंत समृद्ध वाटणाऱ्या बंगाली भाषेचे त्यांना इस्लामीकरण करावेसे वाटते. पूर्वी अस्मितेचे प्रतीक असणारे रवींद्रनाथ आता त्यांना हिंदू म्हणून नाकारावेसे वाटतात.

स्त्रियांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. याबरोबरच इस्लामचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रामायण महाभारत उपनिषदे वेद ब्राह्मण निरनिराळ्या संहीता यांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा त्या धांडोळा घेतात. अशाप्रकारे स्त्रियांविषयीच्या अनेक पैलूंची हे पुस्तक चर्चा करते.

-आशुतोष गं जोगळेकर
मोब-९८६०५७३०५१

द्वारा : समीक्षक