बुल्स बेअर्स अँड अदर बिस्ट्स

लेखक:संतोष नायर अनुवाद: मीना शेटे - संभू

मंजुळ पब्लिकेशन्स

/media/9pYz9w3zdkBo.jpeg

पाने : ☀ 500 मुल्य (₹): 500.0

उदारीकरणानंतरच्या भारतीय शेअर बाजाराचा चैतन्यपूर्ण इतिहास. - हर्षल भानुशाली

या कथेच्या सूत्रधाराचं नाव लाला असं आहे. ते एक काल्पनिक पात्र आहे. सन १९८८ च्या अखेरीपासून ते २०१५ च्या उत्तरार्धपर्यंतच्या सत्ता असून २७ हून अधिक वर्षाच्या कालावधीत भारतीय शेअर बाजारात चाललेली बरीचशी तारेवरची कसरत अगदी जवळून पाहणारा तो एक साक्षीदारी आहे.

लाला आपल्याला २७ वर्षाच्या काळाचा एक खिळवून ठेवणारा रोमहर्षक प्रवास घडवतो. भारतातील अनेक आर्थिक गैरव्यवहार, राजकीय आणि आर्थिक चढ-उतार, पाकिस्तानविरुद्ध झालेले युद्ध, भारतातील आयटी उद्योगक्षेत्राची वाढ, अनेक कंपन्यांचे उदय आणि त्यांचं नामशेष होणं, त्यांचं शेअर बाजारातील मूल्य आणि व्यवसायाचे मालक, व्यवस्थापक आणि त्याचबरोबर 'बाजारातील लोक' यांचा नावलौकिक या सगळ्या, सगळ्या गोष्टींची तो आपल्याला सविस्तर हकीकत सांगतो.

या पुस्तकातून आपल्याला मानवी स्वभावाविषयी बरंच काही शिकायला मिळतं. लोक यंत्रणेशी कसं खेळतात, नियामक हे बहुदा नेहमीच झपाट्यानं विकसित होणाऱ्या लुच्या लोकांच्या मागे कसे लागतात हे आपल्याला समजतं. लबाड लोकांकडून निष्पाप आणि भोळ्या किंवा थोड्याफार मूर्ख लोकांना त्यांचा पैसा गमवायला कसं भाग पाडलं जातं ते आपल्याला पाहायला मिळतं. ब्रोकिंग व्यवसायातील, इन्व्हेस्टमेंट बँकिंगमधील आणि पैशाच्या व्यवस्थापनातील विकृत सवलतीमुळे ग्राहकांना नेहमीच वास्तविक मूल्याहून कमी पैसा कसा मिळतो हेही इथे दाखवून देण्यात आलं आहे.

लेखक गेल्या अनेक वर्षापासून नियमितपणे रोजनिशी लिहीत आहेत. या रोजनिशीत त्यांनी प्रत्येक दिवसातील महत्त्वाच्या घटना - घडामोडी , अन्योन्य क्रिया आणि इतर अनुभव यांची अतिशय काटेकोरपणे नोंद केली आहे. हे पुस्तक तयार होण्यात या सवयीचा मोठाच वाटा आहे. लेखक संतोष यांनी एक प्रमुख पात्र म्हणून लाला या काल्पनिक पत्राची निर्मिती केल्याचे दिसतं. इतक्या सगळ्या वर्षात लेखकाने त्यांच्या रोजनिशीत जे लिहून ठेवलं आहे, ते सगळं ते या पात्राच्या तोंडून वदवून घेतात.या अर्थांन लाला हे खरं तर मुळीच काल्पनिक पात्र नाही!

सुज्ञ आणि धूर्त लालचंद गुप्ता तुम्हाला दलाल स्ट्रीटवरून शेअर बाजाराच्या सर्वसमावेश इतिहासाची रोमहर्षक सफर घडवून आणतो . तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील भरभराटीच्या काळापासून , बँकांना देय करांमधील चुकवेगिरीपर्यंत आणि पैशाच्या बेकायदेशीर हस्तांतरणापर्यंत सारं काही लालाला माहीत आहे . बाजारातील गैरव्यवहार , तसंच फिक्सर आणि गुंतवणूकदार यांना बसलेले फटके या सगळ्या गोष्टी लालानं पाहिल्या आहेत . ही खास ' पाचवी वर्धापनदिन आवृत्ती ' अगदी सध्याच्या काळापर्यंत ही कथा घेऊन येते . अगदी अलीकडच्या काळापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये घडणाऱ्या घडामोडींविषयीची बारकाईनं केलेली निरीक्षणंही वाचकांना सापडतात . शिवाय लालाच्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लाला हुशारीनं कशी गुंतवणूक करावी , याविषयीच्या काही खाचाखोचाही सांगतो .

देशाच्या आर्थिक आरोग्यात रुची असलेल्यांनी आणि सध्याच्या खूपच रुक्ष शेअर बाजारातील कामकाजापर्यंत आपण पोहोचेपर्यंत कोणकोणत्या खळबळजनक घटना घडून गेल्या आहेत , याविषयीची उत्सुकता असलेल्यांनी बुल्स , बेअर्स अँड अदर बिस्ट्स हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे .

लेखक परिचय

संतोष नायर हे सीएनबीसीटीव्ही 18 डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील पत्रकारितेचा वीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ‘स्ट्रीट सायन्स’ या त्यांच्या दैनंदिन स्तंभलेखनातून शेअर बाजारातील महत्त्वाचे व्यवहार, बाजारातील कल आणि त्या संदर्भातीलल चर्चा व गप्पा यांची माहिती दिली जात होती. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’चे मार्केट्स संपादक म्हणून त्यांनी 2006-2020 या काळात काम केलं. याशिवाय विविध संस्था, बाजारातील कल, गोपनीय आणि लबाडीच्या कृती यावरही त्यांनी लेखन केलं. त्यानंतर त्यांनी मनीकंट्रोलडॉटकॉमचे संपादक म्हणून 2020-2021 या काळात काम केलं.

संपर्क: हर्षल भानुशाली ९६१९८०००३०

द्वारा : पुस्तक स्टेशन