नापास मुलांची गोष्ट
संपादन: अरुण शेवते
ऋतुरंग प्रकाशन
नापास मुलांची गोष्ट
संपादन: अरुण शेवते
ऋतुरंग प्रकाशन
पाने : ☀ 248 मुल्य (₹): 250.0
मनोगत
ऋतुरंग २००३चा दिवाळी अंक नापास मुलांवर होता. अंकाला चांगला प्रतिसाद मिळाला. १९९३ साली 'ऋतुरंग'चा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. अकरा वर्षात 'ऋतुरंग' दिवाळी अंकातील निवडक लेखांची दहा पुस्तके प्रकाशित झाली. हे अकरावे पुस्तक प्रकाशित होतांना मला आनंद वाटतो.
मुलाला परीक्षेत कमी गुण मिळाले तर आईवडील निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, रामानुजन, आगस्त्यु रोदँ, इंदिरा गांधी, आर. के. नारायण, कुसुमाग्रज, ना. सी. फडके, यशवंतराव चव्हाण, दया पवार, सी. रामचंद्र, शांता शेळके, गुलजार, आर. के. लक्ष्मण, सुशीलकुमार शिंदे, चंद्रशेखर धर्माधिकारी, वाय. सी. पवार, जयंत साळगांवकर, नरेंद्र जाधव, यशवंतराव गडाख, लक्ष्मण माने ही काही तत्वज्ञ, राजकारणी, चित्रकार, कलावंत, लेखक माणसे गणितात, इंग्लिशमध्ये, चित्रकलेत, भाषा विषयात नापास झालेली आहेत. आपल्या शालेय जीवनात, कॉलेजमध्ये निराशेचे ढग त्यांनी अनुभवले आहेत. पण ही माणसे निराश झालेली नाहीत. नापास झाल्यावर त्यांचे आयुष्य थांबले नाही. त्यांनी
आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. समाजाला आनंद दिला.
या मोठ्या माणसांचे बालपण, भावविश्व, मनातील उलघाल मनाला अस्वस्थ करते. त्यांनी पुढच्या आयुष्यात मिळवलेले मोठेपण आपल्याला भारावून टाकते.
अशा नापास झालेल्या मोठ्या माणसांच्या गोष्टी तुमच्या मनात रुजून बसतील. कुठल्याही क्षेत्रात कधी तुम्हाला अपयश आले तर या मोठ्या माणसांचे चेहरे तुम्हाला आठवतील. तुमचे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी.
मुलाला परिक्षेत कमी गुण मिळाले तर आई वडिल निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, अगस्त्यु रोदँ, रामानुजन, इंदिरा गांधी, राजकपूर, यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, दया पवार, ना. सी. फडके, आर. के. नारायण, सी. रामचंद्र, शांता शेळके, आर. के. लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे, चंद्रशेखर धर्माधिकारी, जयंत साळगावकर नरेंद्र जाधव, यशवंतराव गडाख, लक्ष्मण माने, वाय. सी. पवार, ही काही तत्वज्ञ, राजकारणी, चित्रकार, कलावंत, लेखक माणसे गणितात, इंग्लिशमध्ये, चित्रकलेत, भाषा विषयात नापास झालेली आहेत. आपल्या शालेय जीवनात, कॉलेजमध्ये निराशेचे ढग त्यांनी अनुभवले आहेत. पण (ही माणसे निराश झालेली नाहीत. नापास झाल्यावर त्यांचे आयुष्यःथांबले नाही. त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. समाजाला आनंद दिला. या मोठ्या माणसांचे बालपण, भावविश्व, मनातील उलघाल मनाला अस्वस्थ करते.
त्यांनी पुढच्या आयुष्यात मिळवलेले मोठेपण आपल्याला भारावून टाकते. अशा नापास झालेल्या मोठ्या माणसाच्या गोष्टी तुमच्या मनात रुजून बसतील. कुठल्याही क्षेत्रात कधी तुम्हाला अपयश आलेतर या मोठ्या माणसांचे चेहरे तुम्हाला आठवतील. तुमचे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी.
अरुण शेवते
बी-१०२, लिंक पॅलेस,
साईबाबा कॉम्प्लेक्स, गोरेगांव (पूर्व),
मुंबई ४०० ०६३.
फोन : २८४० ४९८०