स्मरणे गोनीदांची
वीणा देव विजय देव
मृण्मयी प्रकाशन
स्मरणे गोनीदांची
वीणा देव विजय देव
मृण्मयी प्रकाशन
पाने : ☀ 269 मुल्य (₹): 250.0
बऱ्याचदा म्हटलं जातं की टॉक अबाउट द नोव्हेल अँड नॉट द नॉवेलिस्ट पण काही वेळा पुस्तक वाचता वाचता लेखकाबद्दल सुद्धा जाणून घ्यावसं वाटतं आणि म्हणून स्मरणे गोनीदांची सारखं पुस्तक वाचकांना अपील होतं.
गो.नी. दांडेकर गेल्यानंतर वीणा देव आणि विजय देव यांनी त्यांच्या आठवणींचे लिखाणाचे निरनिराळ्या लोकांच्या आठवणीचे लिखाणांचे अशा प्रकारचे संकलन करून हे पुस्तक काढलेले आहे
यामधे गोनीदांच्या व्यक्तिमत्त्वाचे, लेखनाचे वेगवेगळे पैलू वेगवेगळ्या लोकांनी दाखवलेले आहेत. ही सगळीच माणसं आपापल्या क्षेत्रामधे खूप मोठी आहेत. त्यात अभिनेते सूर्यकांत आहेत. श्रीराम लागू आहेत. दिग्दर्शिका विजया मेहता आहेत. साहित्यिक भारत सासणे आहेत. स्वतः वीणा देव, विजय देव आणि मृणाल देव आहेत. बाबासाहेब पुरंदरे आहेत. राम शेवाळकर आहेत. बिंदू माधव जोशी आहेत. शकुंतला फडणीस आहेत. आशा भोसले आहेत. प्रत्येकाला गोनीदांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यांच्या साहित्याचे झालेलं वेगळं दर्शन त्यांनी मांडलेलं आहे. ज्या वाचकाला गो.नी. दांडेकरांचे साहित्य अजिबातच माहीत नाही अशा वाचकासाठी हे पुस्तक गोनीदांच्या साहित्याबाबत उत्सुकता निर्माण करणारे ठरते
-आशतोष गं जोगळेकर
मोब-९८६०५७३०५१