अफगाण डायरी काल आणि आज! - प्रतिभा रानडे

राजहंस प्रकाशन

पाने : ☀ 0 मुल्य (₹): 350.0

/media/614Mf0Yd3CL.jpg

अफगाणिस्थान आणि तालिबान समजून घेताना... - हर्षल भानुशाली ९६१९८०००३०

अफगाण डायरी काल आणि आज!

अफगाणिस्थान आणि तालिबान समजून घेताना...

बाल्हिक शहरात जेंव्हा लेखिका पाणी पिते तेंव्हा त्या पाण्याला घाणेरडा वास येतो! त्याची चव ही कशीतरी असते! यावर तेथील गाईड म्हणतो, "या मातीत इतके रक्त सांडले आहे, इतके हाडे गाढली गेली आहेत की येथील पाण्याला रक्ताचा वास येतो!"

अफगाणिस्थान चे सर्व चित्र या पुस्तकातून कळते.... मुहमद घोरी, गजनी पासून ओसामा बिन लादेन पर्यन्तआज पर्यंत चे!

पुस्तक:अफगाण डायरी काल आणि आज

लेखन: प्रतिभा रानडे

राजहंस प्रकाशन

लेखिका स्वतः अफाणिस्तानमधील वास्तव्याला होत्या.तेथील जनमानसात त्या मिसळल्या.वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या.जाणकारांच्या मुलाखती घेतल्या.त्या स्वतः अतिशय अभ्यासू आहेतच पण त्यांनी त्या देशातील अनेकांची मदत घेतली...या पुस्तकाची दुसरी एडिशन असल्याने अगदी अलीकडे घडलेल्या घटना घडामोडी यात लिहिलेले आहेत.अफगाणिस्थान ची एकूण पूर्ण कल्पना येण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे!

प्राचीन इतिहास

अफगाणिस्थान! जेथे कधीकाळी वेदांच्या ऋचा गायल्या गेल्या,रचल्या गेल्या!जेथे गांधारी वाढली तो गांधार देश! शकुनीचा मामा चां हा प्रदेश!

अफगाणिस्थान!जेथे शिक्षणाची गंगा वाहत होती! जेथे होते ,तक्षशिला सारखे जागतिक दर्जाचे किंबहुना जगातील श्रेष्ठ विद्यापीठ!

अफगाणिस्थान! जेथे बुद्ध धर्मीय राजा सुख शांतीने राज्य करत होता! जेथे बामिया च्या पर्वतावर जागतिक व्यापारी महामार्गावर जगातील सर्वात उंच अशा गौतम बुद्धांच्या मूर्ती निर्माण केल्या होत्या!(१२० आणि १७५ फूट उंच) जेथील पर्वतांच्या गुफांमध्ये बुद्ध धम्म आणि त्रिपीटकाचे गाण करणारे हजारो बुद्ध भिक्कु निवास करत होते!गुहांच्या भिंतींवर जातक कथा कोरल्या गेल्या!

अफगाणिस्थान! जेथे झरतुष्ट्राचे "अवेस्ताचे" लेखन आणि गायन झाले! जेथे सिकंदर(ई.पूर्व३३१) ला ही आपला पाडाव टाकावा वाटला तो अफगाणिस्तान!

याच अफगाणिस्तान हिंदू, बुद्ध आणि शीख आनंदाने राहत होते!पण अरबस्तान आता बदलला होता.

इस्लामचा उदय झाला होता.इस्लाम चा स्वीकार केलेल्या टोळ्या आता वाळवंटातून सुपीक जमिनीकडे धाव घेत होत्या!या टोळ्या शुर होत्या! या टोळ्या साहसी होत्या! या टोळ्या निर्मम होत्या! क्रूर होत्या! बर्बर होत्या!हत्या आणि लूट हे त्यांचे धोरण होते! आधीच जंगली आणि त्यातून धर्मांधता यामुळे या टोळ्या रक्त पाण्यासारखे वाहत असत!

अशीच एक टोळी तुर्कस्थान मधून आली!(इ. स.९७०) त्याने बामियानच्या राजाचा पराभव केला. बुद्ध भिक्कू जंगलातून ,पर्वतातून परागंदा होऊन गेले!येथील भयंकर पडणारी थंडी प्रत्येक आक्रमण मोडून काढत असे! तसे हे ही आक्रमण मोडून निघाले!

पण त्यानंतर आलेला चांगिजखान याने मात्र हे शहर अक्षरशः पूर्ण मोडून काढले!याच लढाईत त्याचा नातू मारला गेला! त्याने हे शहर बेचिराख केले.प्रत्येक माणूस उभा कापला! याच शहराचे नाव "शहर इ घुलघुला" पडले! करून किंकाळ्याचे ,भयाण शांततेचे शहर! बुद्ध मठ आणि विहार खणून काढले! हजारो बुद्ध भिक्षूंना ठार मारले.

या बुद्ध मूर्ती ज्या कधीकाळी शांतीचा संदेश देत होत्या त्या फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला....प्रत्येक आक्रमक या मूर्ती फोडत गेला! अलीकडे तर या मूर्ती नेमबाजी शिकण्यासाठी वापरल्या गेल्या! ओसमा बिन लादेन च्या काळात उरले सुरले अवशेष तोफा लावून उडवण्यात आले!जेथे मठ होते तेथे भटक्या जमाती राहायला लागल्या!त्यांचे संसार येथे फुलायला लागले.

अफगाणिस्थान जेथून आपल्या देशावर क्रूर आक्रमणाचा डोंब उसळला! एका नंतर एक टोळधाड भारतावर तुटून पडली!आमच्या देशातील प्रत्येक गोष्ट लुटली!मंदिरे, विहारे, गुरूद्वारे असे धार्मिक क्षेत्रे लुटली! गायी गुर लुटली! आया बाया लुटल्या! लाखो गुलाम करून नेले! बळजबरीने भोगले! बाट्वले!शेवटी हिंदुकुश च्या पायथ्याला मारण्यासाठी सोडून दिले! हिंदूंचे शिरकाण केल्यामुळेच या पर्वताला हिंदुकुश नाव पडले!

गजनीचा शेवटचा राजा जयपाल! मध्य आशियामधील सक्तबिन पराभूत केला!पराभूत राजा जयपाल पेशावर येथे पळून गेला. तेथील राजा विजयपाल आणि जयपाल दोघांनी सक्तबिन विरुध्द घनघोर लढाई केली...पराभव झाला! या दोघांनी आत्महत्या केल्या! इस १००० च्या सुमाराला अफगाणिस्थान चे शेवटचे हिंदू राजे संपले!

भारतीय विद्वानांनी मात्र या सर्व घटना केवळ लूट म्हणून पहिल्या! दुर्दैवाने धार्मिक अंग असूनही त्याकडे दुर्लक्ष केले.किंवा तसे त्यांना त्यांच्या सेक्युलॅरिझम मुळे करावे वाटले असावे याचे लेखिकेला आश्चर्य वाटते!

टोळ्या चालूच होत्या! एकापेक्षा एक उग्र! सक्तीचे धर्मांतरण ही सुरू होते! यात सर्वात क्रूर होता गाजनीचा महमद सुलतान! यालाच मोहम्मद गजनी असे म्हणतात! ज्याने सोमनाथ मंदिर लुटले!....पुढे राजा रणजितसिंह यांनी तेथील प्रदेश जिंकून काही गोष्टी भारतात पुन्हा आणल्या!

त्यानंतर आला अल्लाउद्दीन घोरी ज्याचा मोहम्मद घोरी म्हणून ही उल्लेख येतो तो जाळण्यासाठी प्रसिद्ध होता!त्याचे दुसरे नाव "जहानसोज" म्हणजे जग जाळणारा! हे होते!!त्याने ११४९ मध्ये गजनी जाळून टाकले.

शेवटचे आक्रमण म्हणजे अहमदशहा अब्दाली! पानिपत!ज्याला अफगाणी लोक अहमदशाह बाबा म्हणतात!भारतातून कोहिनूर लुटणाऱ्या नादीरशहा चे नाव ऐकले असेलच!

रक्तपात! लूट! जाळपोळ! हत्या आणि बळाचा रानटी वापर! बल्हिक शहरात जेंव्हा लेखिका पाणी पिते तेंव्हा त्या पाण्याला घाणेरडा वास येतो! त्याची चव ही कशीतरी असते! यावर तेथील गाईड म्हणतो, "या मातीत इतके रक्त सांडले आहे, इतके हाडे गाढली गेली आहेत की येथील पाण्याला रक्ताचा वास येतो!"

असे वर्णन वाचून वाचकांना वाटेल कसा हा देश! आज ही तसच काही नाही का तेथे! पण येथे ही सुधारणा करणारे काहीकाळ आले! पण त्यांना देश सोडून पळून जावे लागले! असाच एक राजा होता आणि त्याची राणी होती जिला आपले शेवटचे दिवस अतिशय गरिबीत आणि दारिद्र्यात इटली मध्ये व्यतीत करावे लागले!त्यांचा गुन्हा एकच होता,त्यांनी अफगाणिस्तान ला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला! मुलींना शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या! न्यायदानाचे काम मुल्ला मैलवी नव्हे तर प्रशिक्षित सरकारी आधिकारी करू लागले.राणी बुरखा सोडून वागू लागली! परिणाम व्हायचा तो झाला!देश चक्क गुंडाच्या ताब्यात गेला! सगळी मुल्ला मौलवी एकत्र येऊन टोळीवाल्यांना उचलून धरू लागले.त्यांनी बच्चा नावाच्या गुंडाला मदत केली...इंग्रजांच्या मदतीने सत्ता हातात घेतली!

वरील घटनेवरून अफगाणिस्थान ची परिस्थिती कोणालाही सहज समजेल!

अशा अशांत आणि अस्थिर वातावरणात रशियाने आपले बाहुले असलेले सरकार बसवले.रशियाच्या या क्रूर कम्युनिस्ट सरकार विरुद्ध लोकांमध्ये नाराजी पसरू लागली.धर्म वेडे विरुध्द निधर्मी असा उभा संघर्ष निर्माण झाला.दोन्ही बाजू अतिशय हिंसक आणि क्रूर! यातून अमेरिकेनं अफगाणिस्थान मधील धार्मिक लोकांना जवळ धरले! प्रचंड पैसा आणि शस्त्रे पुरवली! अफगाणिस्तान मध्ये रशिया विरुध्द मोठी आघाडी उभी राहिली! जिहाद पुकारला गेला!रशिया ने अफगाणिस्थान सरकारच्या नावे आणि स्वतः होऊन जिहादी गटांना चिरडून टाकण्यासाठी उघड युद्ध पुकारले! एका बाजूला दहशदवादी होते तर दुसऱ्या बाजूला सरकारी दहशतवाद होता! खांद्यावरून विमानांना भेदनारी शस्त्रे जेंव्हा मिळाली तेंव्हा त्याचा वापर करून शेकडो विमाने भेदली गेली!

दरम्यानच्या काळात रशियाच वाटोळे झाले.त्याचे विभाजन झाले.शीतयुद्ध संपले.अमेरिकेला अफगाणिस्थान मध्ये रस राहिला नाही.अमेरिकेने पोसलेल्या लोकांना आता उपाशी रहायची वेळ येऊ लागली!दहशत वादाचा भस्मासुर आता विक्राळ रूप धारण करत होता.इजिप्त मधून आलेले आतंकवादी अफगाणिस्तानचे कर्ते धर्ते होऊ लागले. अमेरिके विरुध्द तरुणांची मन पेटवली जाऊ लागली!

ओसामा बिन लादेन ,अल कायदा ,जवाहरी आणि मुल्ला ओमर ही नावे वाचकांना माहिती आहेत!आता यांनी इस्लाम विरुध्द जे जे देश आहेत अशा सर्वांच्या विरुध्द जिहाद पुकारला! इस्राएल, रशिया,अमेरिका आणि भारत देखील! त्यानंतर अमेरिकेवर हल्ला झाला! त्याचे परिणाम म्हणून अमेरिकेने अफगाणिस्थान मध्ये पुन्हा लक्ष घातले.

अफगाणिस्थान मधील तालिबानी सरकार विरुद्ध युद्ध सुरू झाले.....ओसामा बिन लादेन पळून गेला.अमेरिकेचे लष्कर अफगाणिस्थान मध्ये राहिले....आता ते ही गेले.आजची परिस्थिती निर्माण झाली.

द्वारा : पुस्तक स्टेशन
  Never miss a story from us, get weekly updates in your inbox.