जुगाड इनोव्हेशन

लेखक : नवी राजू, जयदीप प्रभू, सिमॉन आहुजा अनुवाद : संध्या रानडे

मनोविकास प्रकाशन

/media/जुगाड इनोव्हेशन_jugaad.jpg

पाने : ☀ 374 मुल्य (₹): 350.0

प्रस्तावना - आर. एन. टाटा

जगभरातल्या कंपन्यांना बऱ्याचदा अशा व्यावसायिक वातावरणाला सामोरं जावं लागतं, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता वर्षानुवर्षं विकसनशील देशांनाच त्रस्त करत होती; पण आता हीच समस्या अत्याधुनिक देशांच्या अर्थव्यवस्थांपुढेही उभी राहिली आहे आणि त्याचं कारण आहे, वातावरणात वेळीअवेळी होणारे आणि ज्यांच्याशी तातडीने सामना करावा लागेल असे बदल. बाजारपेठांमध्ये अस्थिर, गुंतागुंतीची आणि गतिमान अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचं कारण आहे माहिती तंत्रज्ञानाची आलेली प्रचंड मोठी लाट आणि समाजमाध्यमांचा (सोशल मीडियाचा) झालेला उदय!

अशा परिस्थितीत एक सत्य तर उघडच आहे, की यशस्वी लोक आणि *ऑल्सो-रॅन'प्रकारचे लोक, या दोघांमधला फरक स्पष्टपणे दाखवून देणारा 'परवलीचा शब्द असणार आहे, तो म्हणजे कल्पक संशोधन! आणि इथे महत्त्वाचे प्रश्‍न असणार आहेत : स्वत:मधली ही स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्याच्या आणि ती टिकवूनही ठेवण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारच्या संशोधनाची कंपनीला गरज आहे; आणि त्या प्रकारच्या संशोधनाची पद्धत आपल्या कंपनीमध्ये रुजवून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत?

सध्याच्या काळात हे प्रश्‍न कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत; आणि त्यांच्यावर भाष्य करणाऱ्या, या प्रश्‍नांची उत्तर शोधायला मदत करणाऱ्या पुस्तकांनी सगळ्यांचीच कपाटं गच्च भरलेली दिसतात. हेही अशाच प्रकारचं आणखी एक पुस्तक आहे; पण तरीही ते थेटपणे वाचकांच्या मनाला भिडतं;

कारण हे एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलंय आणि एका वेगळ्या प्रकारच्या आशयाचा प्रत्यय त्यात पानापानांमधून येत राहतो. मुख्य प्रवाहातल्या व्यवस्थापनपद्धतींचा वेध वेगवेगळ्या प्रकारांनी यात घेतलेला दिसून येतो.

*जुगाड' हा एक हिंदी शब्द आहे आणि अगदी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द उपलब्ध नाही. याच कारणं असं आहे, की भारतीयांच्या दैनंदिन जीवनात असलेल्या असंख्य समस्या घरगुती, काटकसरी पद्धतींनी सोडवण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजना म्हणजे जुगाड संशोधन. हीच यामागची संकल्पना आहे. टिकून राहण्याच्या, अडचणींमधून मार्ग काढण्याच्या आणि स्वत:मधली स्पर्धात्मक वृत्ती जोपासत पुढे जाण्याच्या मनोवृत्तीचा खोल आणि सर्वसमावेशक असा विचार लेखकांनी या पुस्तकात मांडला आहे. याबाबतचं महत्त्वपूर्ण असं विवेचन करताना भारतासारख्या विकसनशील देशांबरोबरच पुढारलेल्या देशांच्या व्यावसायिक जीवनाबद्दलही विस्तृत माहिती या पुस्तकाच्या लेखकांनी वाचकांपुढे ठेवली आहे. आजच्या कठीण काळात आवश्यक असलेली, विकास साधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी कार्यपद्धती व्यावसायिक मंडळींसाठी या पुस्तकात जागोजागी समजावून दिली गेलेली दिसते; आणि पुस्तक वाचत असताना ती त्यांच्या मनावर आपोआपच बिंबवलीही जाते.

या पुस्तकाचे लेखक एक महत्त्वाची गोष्ट वाचकांच्या निदर्शनास आणून देतात, ती म्हणजे, पाश्‍चिमात्य देशांमध्ये संशोधन केलं जातं, ते साचेबद्ध अशा रिसर्च अँड ड्रेव्हलपमेंट (२ & 1)) विभागात आणि तशाच साचेबद्ध पद्धतींनी! आणि त्यामुळे दर्जा आणि ठामपणा या बाबतींमध्ये त्या संशोधनाला काही मर्यादा पडतात. या संदर्भात लेखकांनी ब्रिक देशांमधल्या (ब्राझील, रशिया, इंडिया, चायना - छारा0) आणि इतरही काही विकसनशील देशांच्या कंपन्यांबरोबरच श्रीमंत देशांमधल्याही कंपन्यांची उदाहरणं वाचकांपुढे ठेवली आहेत. त्यातून त्यांनी हे सत्य सगळ्यांच्याच लक्षात आणून दिलंय, की सध्याच्या ह्या आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात कंपन्यांनी त्यांच्या साचेबद्ध आणि अत्यंत महाग अशा “आर अँड डी' पद्धतीला जुगाड संशोधनाच्या अधिक लवचीक, काटकसरी आणि अंत:प्रेरणेला प्रमाण मानणाऱ्या मनोबत्तीची जोड दिली पाहिजे. नाहीपेक्षा आहे ह्या परिस्थितीत त्यांचा निभाव लागणं कठीणच आहे.

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सर्व देशांमधल्या सी.ई.ओं.ना आणि व्यावसायिकांना व्यावसायिक संदर्भातल्या काही विशिष्ट गोष्टी 'कशा कराव्यात' या बाबतीत लेखकांनी दिलेले उत्कृष्ट धडे! व्यवस्थितपणे समजावून सांगितलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या सहा तत्त्वांवर आधारित सुसंगत आणि एकत्रित अशा पद्धतींचा अवलंब कसा करावा आणि स्वत:मध्ये जुगाड मनोवृत्ती कशी रुजवून घ्यावी, याचं अभ्यासपूर्ण तंत्रच त्यांनी या कंपन्यांपुढे ठेवलं आहे. 'विपरीत परिस्थितीतही नव्या संधींचा शोध घेणं, कमतरतेतून विपुलता निर्माण करणं, विचार आणि कृती यांच्यात लवचीकपणा ठेवणं, साधेपणा जपणं, वंचितांना स्वत:च्या व्यवसायात सामावून घेणं आणि स्वत:च्या मनाचं ऐकणं, ही ती तत्त्वं. ही सहा तत्त्वं नुसतीच ऐकली, तर ती सारासार विवेकशक्‍तीवर आधारित आहेत, हे कुणालाही फक्त जाणवतं! पण या पुस्तकात ती सहा तत्त्वं जिवंत होऊन त्यांच्या महतीचा प्रत्यय वाचकांना देण्याचं काम करतात.

“भारतात सगळ्याच क्षेत्रांमध्ये जलद विकास होणं आणि तो तसाच टिकूनही राहणं ही आत्यंतिक गरजेची गोष्ट आहे' हे सत्य सर्वमान्य आहे आणि त्यामुळेच भारतीय वाचकांच्या दृष्टीने या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. जुगाड संशोधनाच्या मदतीने व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त अशी अनेक उत्पादनं आणि सेवा यांची निर्मिती करणाऱ्या बर्‍याचशा भारतीय कंपन्यांची उदाहरणं हे पुस्तक वाचकांपुढे ठेवतं. ह्या सेवा आणि उत्पादनं सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध होतील आणि आर्थिकदृष्ट्याही ती त्यांना परवडतील, या गोष्टींकडे ह्या कंपन्यांनी विशेष लक्षसुद्धा पुरवलेलं दिसतं. शेतकी व्यवसाय, आरोग्य सेवा, ऊर्जानिर्मिती आणि तिचं वितरण, आर्थिक सेवा, अशा सर्वच क्षेत्रांचा यांत समावेश आहे. या सेवा आणि ही उत्पादनं ह्यांची निर्मिती करताना सर्वसामान्यांच्या इच्छा पुरवण्यापेक्षाही त्यांच्या गरजा भागवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाईल, यावर हे उत्पादक भर देतात. अशा तर्‍हेच्या व्यावसायिक पद्धतींचा वापर करत ह्या गोष्टींची निर्मिती आणि वितरण केलं जातं, ज्या दीर्घकाळ टिकतील आणि ग्राहकांचं हित साधत असतानाच कंपन्या स्वत:चाही फायदा करून घेऊ शकतील.

या पुस्तकाचे लेखक कुणालाही पटेल असा आणखी एक मुद्दा या पुस्तकात अधोरेखित करतात; तो म्हणजे, भारताने आपली उत्पादनं आणि सेवा यांचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे आणि ते सर्वत्र आणि तातडीनं केलं जाणं आवश्यक आहे. हे करण्यासाठी भारतीय व्यावसायिकांनी जुगाड मानसिकतेचा आणि जुगाड संशोधन संस्कृतीचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतरही अनेक क्षेत्रांमध्ये प्रसार करायला हवा. आणखी एक अतिशय रास्त असा मुद्दा ते इथे आवर्जून वाचकांपुढे मांडतात, तो म्हणजे, भारतीय व्यवसायक्षेत्राने पाश्‍चिमात्यांची साचेबद्ध *आर अँड डी" संशोधन पद्धती त्यांच्या सुरळीतपणे सुरू असलेल्या जुगाड पद्धतीत सहजपणे मिसळून घ्यायला हवी. त्यामुळे त्यांच्या कंपन्यांमध्ये दोन्ही प्रकारच्या संशोधन पद्धतींच्या दृष्टिकोनांचा सुवर्णमध्य साधणारा बळकट आणि टिकाऊ असा समतोल आपोआपच साधला जाईल.

ज्या कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना आणि व्यावसायिकांना यशस्वी व्हायचंय आणि स्वत:चा विकासही करून घ्यायचाय त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. साधनसामग्रीच्या बाबतीत कायम अभावग्रस्त असणाऱ्या भारतासारख्या देशामध्येच फक्त नाही, तर जमातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये- ज्यांना हे साध्य करायचं आहे, त्यांना हे. पुस्तक उपयुक्त वाचनापलीकडेही आणखी बरंच काही देऊन जातं!

- आर. एन. टाटा
चेअरमन, टाटा ग्रूप

द्वारा : पुस्तकातुन साभार