Description
विशेषणांची उधळण केली, तरीही ज्यांचे वर्णन पुरे होऊ शकणार नाही, अशा शिवाजी महाराजांचा सर्वाधिक लक्षणीय गुणविशेष म्हणजे त्यांचे युद्धनेतृत्त्व!
राजांनी असंख्य लहानमोठे विजय मिळवले त्यांना काही बोचरे पराभव पत्करावे लागले. पण त्या पराभवांचे विजयात रूपांतर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली. तो पराक्रम घडवतानाच त्यांनी जे डावपेच लढवले,ज्या युक्त्या प्रयुक्त्या योजल्या, ज्या व्यूहरचना आखल्या, त्यांचे लष्करी विश्लेषण करून दाखवणारा हा ग्रंथ.
प्राचीन –अर्वाचीन युध्दशास्त्राच्या लष्करी सूत्रांच्या प्रकाशात महाराजांच्या अलौकिकत्वाचे झळाळते दर्शन घडवणारा आणि जागतिक सेनानीच्या नामावळीत त्यांचे अग्रहक्काचे स्थान अधोरेखित करणारा हा ग्रंथ प्रत्येक शिवप्रेमीने, इतिहास अभ्यासकाने वाचायलाच हवा आणि संग्रही देखील हवाच!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात हजारो पुस्तकं उपलब्ध असताना अजून एका पुस्तकाची भर घालण्यात विशेष काय? असा प्रश्न लेखक स्वतःला विचारतो आणि त्याचे उत्तर ही स्वतः देतो. हजारो पुस्तकं असली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी व्यवस्था आणि डावपेच या संदर्भात एखाद्या या विषयातील तज्ञाने असे पुस्तक लिहिलेलं नाही. जगातील अनेक सैन्य अभ्यासक्रमात शिवरायांनी केलेल्या लढायांचा समावेश आहे. आज आपल्याकडे सर्वसामान्य वाचकासाठी मात्र याची नेमकी उणीव असल्याचे लेखकांना जाणवले आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. लेखक स्वत: सैनिकी अधिकारी होते त्यांचा दृष्टीने शिवाजी महाराजांच्या लष्करी डावपेचांची उकल आणि मांडणी लेखक करतात.
युद्ध शास्त्रातील अनेक विद्वानांनी (सेनापती) सांगितलेल्या धोरणांचा शिवरायांनी उपयोग केलेला आहे.यातील काही दोन अडीच हजार वर्षापूर्वीचे ही आहेत आणि काही अलीकडील! उदा चिनी तज्ञ सुत्झु ज्याने आर्ट ऑफ वॉर लेहीलेले आहे.दुसरा बेसिल लिडेल हार्ट!
चिनी तज्ञ सुत्झु म्हणतो सगळ्यात भारी युद्ध कोणते, तर ते न लढताच जिंकणे….शाहिस्तेखान कसा पराजित झाला? अर्थात हे युद्ध झालेच नाही.एक लाखाचे सैन्य पराभूत करणे कधीही शक्य नव्हते.
आधुनिक युद्ध शास्त्र दहा प्रमुख गोष्टी वर लक्ष केंद्रित करण्यास सांगते.
१. सिलेक्शन अंड मेंटेनन्स ऑफ डी एम(लक्ष निश्चिती आणि पाठपुरावा)
२. सिक्युरिटी (सुरक्षा)
३. मोबिलिटी (गतिमानता)
४. ऑफेंसिवे ॲक्शन (आक्रमक पवित्रा)
५. इकॉनोमी ऑफ फोर्स (कमीत कमी बळ आणि खर्च)
६. कॉन्सन्ट्रेशन ऑफ फोर्स ( बाळाचे संघटन)
७. सरप्राईज अंड डिसेप्शन (विस्मयकारता)
८. मोराल (मनोधैर्य)
९. कोऑपरेशन (सहकार्य)
१०. लॉजिस्टिक्स (युद्ध व्यवस्थापन)
ही सगळी बिंदू पहिली तर महाराजांनी या सर्व गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास केला होता हे लक्ष्यात येते. या सगळ्या मुद्यांच्या आधारे शिवरायांनी केलेल्या लढायांचा तपशील दिला आहे.विश्लेषण केलं आहे. लेखक स्वतः मेजर जनरल राहिलेले असल्याने स्वाभाविकपणे याचा खोल परिणाम पुस्तकात स्पष्ट दिसून येतो.
लष्करी व्यवस्थापन तर त्या काळात जगात नव्हते इतके काटेकोर महाराजांनी निर्माण केले होते….
आक्रमकता तर शिवरायांच्या लढायांचा स्थायीभाव!युद्ध शास्त्रातील चौथा बिंदू….किल्ला लढवण्याचे प्रसंग वगळता शिवरायांचे सैन्य जवळपास सर्व लढाईत आक्रमक होते.
२६ जून १६६४ चे एक पत्र आहे, त्यात विचारले आहे, “शिवाजीला पंख आहेत का? कारण तो येत असल्याची अफवा पोहचण्याआधीच तो खुद्द तिथे पोहचतो….ही होती गती.युद्ध शास्त्रातील तिसरे तत्व!
शिवरायांनी स्वराज्याची स्थापना त्याचा विस्तार हा कोकण परिसरात केला.त्याचे कारणच लष्करी डावपेच होते.आपली शक्ती आणि मर्यादा यांची जाणीव शिवरायांना होती.स्वराज्याची वाटचाल सुरू झाली ती सह्याद्रीच्या कुशीत!त्याच्याच संरक्षणात शिवरायांनी आपले लष्करी डावपेच खेळले. अचानक आकस्मिक तुटून पडायचे.शत्रू बेसावध असताना त्याला घेरून शक्य तितकं त्याचे नुकसान करायचे.त्याला घाबरून सोडायचे.स्वतःच्या सैन्याचे कमीत कमी नुकसान होईल याची खातरजमा करायची.पहिल्या धक्यातून सावरून शत्रू लढाईला तयार होऊ लागला की तेथून निसटून जायचे ….
असे हल्ले करण्यासाठी शक्यतो रात्रीच्या अंधाराला सोबत घ्यायचे.शत्रूच्या गुप्तहेरांना कळणार नाही याची काळजी घ्यायची.पडता मुसळधार पाऊस आणि जंगल हे तर जणू महाराजांचे परम मित्र!
लष्करी व्यवस्था: मराठा सैन्याची शिस्त इतर सैन्यापेक्षा कडक आणि काटेकोर असे.शत्रू प्रदेशात लूट केल्यानंतर प्रत्येक गोष्ट सरकारातजमा करावी लागे.अन्यथा मोठे शासन केलं जायचे….या उलट पराक्रमी सैनिकाचा मोठा सन्मान केला जायचा. शासन आणि सन्मान दोन्ही दरबार भरवून केला जायचा यातून सर्वांना योग्य तो संदेश जायचा. बलिदान झालेल्या सैन्याच्या विधवांची काळजी घेतली जायची. त्यांना आर्थिक मदत मिळत असे. मुलांना सैन्यात नोकरी दिली जाई. मराठा सैन्याचा पगार हा नेहमी मुघली किंवा आदिलशाही सैन्यापेक्षा जास्त असे.
सर्व मंत्र्यांना लढाईत उतरावे लागे…उदा..मोरोपंत पिंगळे यांनी लढाया गाजवलेल्या होत्या. या उलट सरनोबत पदावरील सरदाराने मुलकी कारभारात लुडबुड महाराजांना अजिबात आवडत नसे.
या उलट इस्लामी सत्तेच्या सैन्याचे वर्तन असे.त्यांना पगार तुटपुंजा असल्याने त्यांचा मुख्य कल हा लूट गोळा करण्यावर असे. सोबतीला प्रचंड असे तंबू, खाणे पिणे आणि जनाना असल्याने इस्लामी सैन्याची हालचाल धिमी असे. उलट मराठा सैनिक पाठीवरील शिध्यावर आपली भूक भागवणारा आणि वेगाने घोडदौड करणारा होता. इस्लामी सत्तेचे मंत्री क्वचितच प्रत्यक्ष लढाईत उतरायचे.
विशेषणांची उधळण केली तरीही ज्यांचे वर्णन पुरे होऊ शकणार नाही, अशा शिवाजी महाराजांचा सर्वाधिक लक्षणीय गुणविशेष म्हणजे त्यांचे युद्ध नेतृत्व!
राजांनी असंख्य लहान मोठे विजय मिळवले त्यांना काही बोचरे पराभव पत्करावे लागले पण त्या पराभवांची विजयात रूपांतर करण्याची किमया त्यांनी करून दाखवली तो पराक्रम घडवताना त्यांनी जे डावपेच लढवले ज्या युक्त्या-प्रयुक्त्या योजल्या रचना आपल्या त्यांचे लष्करी विश्लेषण करून दाखवणारा हा ग्रंथ!
Reviews
There are no reviews yet.