अतुल कहाते ( जन्म १९७३ ) हे मराठी माहितीतंत्रज्ञ व लेखक आहेत. अतुल कहाते यांनी संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, क्रिकेट, कारकीर्द मार्गदर्शन या विषयांवर त्यांनी मराठी वृत्तपत्रांमधून व नियतकालिकांमधून विपुल लिखाण केले आहे. ओघवत्या शैलीत विषयाची सखोल माहिती सोप्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोचवण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या लेखनशैलीत आढळते. त्यांनी इंग्रजीमध्ये २०१८ सालापर्यंत २३ पुस्तके लिहिली असून, ती जगभरात पाठ्यक्रमांतही वापरली जातात. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते आयआयटी, सिंबायोसिस, इंदिरा, फर्ग्युसन, गरवारे अशा अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये `गेस्ट लेक्चरर` म्हणून विविध विषयांवर व्याख्याने देतात. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, सामना, साधना, साप्ताहिक सकाळ, तरुण भारत अशा अनेक प्रकाशनांमधून त्यांचे नियमित ले़खन सुरू असते. आयबीएन लोकमत, साम मराठी या टीव्ही चॅनेल्सवर त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात.
No products found for this author.