Share...

Our Mission

आम्ही म्हणजे टिंब, थोडासा परिचय

स्थानिक भाषांमधील पुस्तकं( प्रथमतः मराठी भाषा) प्रकाशक, वाचक, लेखक ह्यांना एका व्यासपीठ उपलब्ध करुन देणे..

Timb.in हे संकेतस्थळ साहित्य प्रेमींसाठी, मराठी साहित्याच्या समृद्ध वैविध्यपूर्ण साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तयार केले गेले आहे.

हे संकेतस्थळ प्रत्येक वाचकासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.

हे संकेतस्थळ साहित्य प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे.  एकुण माहिति लेखन मुख्यत्वे साहित्य प्रचार प्रसार करण्यासाठी संग्रहित करते आहे.

Timb.in या संकेत स्थळावरील कोणतेही लेखांचे बौद्धिक संपदा अधिकार (कॉपीराइट) मूळ लेखक,प्रकाशक, कंपन्या किंवा व्यक्तींकडे आहेत.

साहित्यीक आणि सामाजिक-सांस्कृतिक वारसा जपण्याकरीताआम्ही नेहमीच प्रयत्नशील आहे.

टिंब :चोखंदळ वाचकांसाठी सर्वोत्तम

टिंब , नावात काय आहे ?नाव असे हवं कि ते अर्थपुर्ण,आगळं वेगळं, ओघवतं..पकड घेणारं ही हवं!

टिंब म्हणजेच बिंदू…..

  • मग हा पूर्णविराम असेल, अनुस्वार असेल किंवा, उद्गार वाचक चिन्हा खाली असेल…
  • एक टिंब वापरलं कीं शब्दांचे अर्थ , वाक्यांचे अर्थ…. सगळं कसं समर्पक….
  • उत्तमोतम पुस्तकांच्या, मासिकांच्या, लेखांच्या शोधात असलेले चोखंदळ गुण ग्राहक असलेल्या या अक्षरनिष्ठांना एकत्र आणणारे आम्ही एक टिंब. सुजाण वाचक घडवू शकेल आणि नव्या पिढीलाही वाचनाची गोडी लावू शकेल असा हा एक उपक्रम!
  • मुख्य संकलन….पुस्तक – परिचय, प्रस्तावना, शिफारस, पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन (previews & reviews)
  • विविध लेख: स्फुट, प्रासंगिक, ललित, इत्यादी.

‘टिंब’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी आम्ही सहमत असतोच असे नाही. भारतीयत्वाने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य आम्ही मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘टिंब’वर स्थान दिले जाते. मात्र त्यात कोणताहि द्वेष, व्यक्तिगत अपशब्द, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीयत्वाशी आमची बांधीलकी आहे.

वैधानिक अन तांत्रिक बाबतित अनियमित पणे बदल होत असतात, ते विचारात घेता ह्या संकेतस्थळावर लेख अचूक आणि कालसुसंगत ठेवण्यासाठी Timb.in नेहमीच प्रयत्नशील असेल.  आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत करू, चुकभुल क्षमस्व!

Books and all about books