अतुल देऊळगावकर- पर्यावरण आणि आदिवासींचा सांगाती, डळमळले भूमंडळ हे त्यांचं पुस्तक आलं आणि लातूरचा भूकंप म्हणजे काय ते नेमकं कळलं.भूकंपावर एवढं सखोल, इतकं परिपूर्ण, इतकं विवेकी दृष्टीकोनातुन लिहिलेलं आणि तरीही लालीत्यपूर्ण दुसरं पुस्तक मराठीत नाही. पाठोपाठ न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात, विश्वाचे आर्त, स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास, विवेकीयांची संगती, ग्रेटाची हाक, बोलिले जे, ऐकता दाट आणि आता आज त्यांचं निसर्गकल्लोळ इत्यादी सुंदर पुस्तके! अतुल देऊळगावकर यांना पर्यावरण आणि आदिवासी संस्कृती यामध्ये सारखाच रस आहे. शिवाय संगीत, चित्रपट हेही त्यांच्या आवडीचे विषय आहेत. लॉरी बेकर, सत्यजित राय आणि कुमार गंधर्व हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
No products found for this author.