अनुराधा गोयल लेखिका आणि ब्लॉगर आहेत. आयटी इण्डस्ट्रीमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव घेतल्यानंतर त्यांनी नुकताच इनोव्हेशन कन्सल्टन्ट म्हणून स्वतंत्ररित्या व्यवसाय सुरु केला आहे. त्याद्वारे त्या विविध संस्थांना नवीन ग्रुप तयार करायला, इनोव्हेशन प्लॅटफॉर्म सेट करायला आणि इनोव्हेशन स्ट्रॅटीजीज आणि रोडमॅप निश्चित करायला मदत करतात.
पंजाबमध्ये जन्मलेल्या अनुराधा यांनी लहानपणापासून वडिलांच्या कामाच्या निमित्ताने खूप प्रवास केला आहे. त्यांच्या बालपणीचा सुरुवातीचा बराच काळ त्या चंदीगढमध्ये राहिल्या, तिथे त्यांनी स्वतःचे जास्त ते शिक्षण पूर्ण केले. अनुराधा यांनी पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगढमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती पण स्वतःचं काहीतरी करण्याच्या आशेमुळे त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी कम्प्युटर सायन्सची निवड केली आणि याच क्षेत्रात पुढची 15 वर्ष करिअर केले.