Timb (टिंब)

भारतीय पोलीस सेवेत अधिकारी असलेले अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी काम केलेलं आहे. त्यातही त्यांनी रॉसाठी खासकरून काम केलं आहे. २००५ साली ते भारताच्या या महत्त्वाच्या तांत्रिक इंटेलिजन्स सर्व्हिसचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी या काळात त्यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे कथा लिहिण्यास सुरुवात केली. परदेशामध्ये काम करताना एजन्ट्स तसंच हेरांना कोणत्या समस्या, अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि आपलं काम पूर्ण केल्यानंतर त्यांना किती आनंद होतो हे वाचकांना कळावं म्हणून त्यांनी या कथा लिहिल्या.

या माध्यमातून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या कहाण्यांना प्रकाशात आणलं, देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या जिवाची बाजी लावूनदेखील त्या सहकाऱ्यांना कधीही म्हणावी तेवढी प्रतिष्ठा व प्रकाशझोत लाभला नाही.

No products found for this author.
Shopping cart close