अरविंद व्यंकटेश गोखले हे ’दैनिक केसरी’चे बारावे संपादक. तेथे ते दहा वर्षे सलग संपादकपदी होते. त्यानंतर ते दैनिक ’लोकसत्ता’चे साहाय्यक संपादक झाले. गोखल्यांची संपादकीय कारकीर्द ३६ वर्षांहून जास्त आहे. अरविंद व्यं गोखले हे आधी इतिहास हा विषय घेऊन एम.ए. झाले. लंडनच्या ‘कॉमनवेल्थ प्रेस युनियन’ची ‘हॅरी ब्रिटन मेमोरिअल फेलोशिप’ (१९७९) आणि वॉशिंग्टनच्या ‘द हेन्री एल स्टिम्सन सेंटर’ची फेलोशिप (१९९८) मिळवून त्यांनी अनुक्रमे पत्रकारिता आणि भारत-पाकिस्तान संबंध यावर संशोधन केले. आंतरराष्ट्रीय संबंध आणि विशेषतः भारत-पाकिस्तान संबंध हे अरविंद व्यं गोखले यांचे अभ्यासाचे खास विषय होत. आपल्या लेखनासाठी त्यांनी अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया यांसह अनेक देशांचे अभ्यासदौरे केले. भारताच्या पंतप्रधानांसमवेतही त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या. अरविंद व्यं गोखले हे पत्रकारिता अभ्यासक्रमांचे मानद व्याख्याते आहेत.
No products found for this author.