अरुण साधू (जन्म : १७ जून १९४१ – २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अरुण साधू हाडाचे पत्रकार होते. त्यांना स्वत:च्या व्यवसायाचा अभिमान होता. वृत्तपत्र स्वातंत्र्य हे सर्वोच्च आहे… पत्रकारांनी आणि देशाच्या नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच म्हणजे माहितीचा संकोच… हुकूमशाहीची सुरुवात… लोकशाहीचा अंत… हे ते अनेकदा सांगायचे. ढासळती मूल्यव्यवस्था ही नेहमीच लेखकांच्या लिखाणाचा विषय असते.
‘मुंबईसारख्या महानगरांमध्ये आधीच प्रचंड गर्दी आहे. त्यात ती वाढत आहे. एका मर्यादेनंतर जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त गर्दी वाढते, तेव्हा ते शहर असहिष्णु होत जातं…’ अरुण साधू
https://www.aksharnama.com/client/article_detail/1311