Timb (टिंब)

आनंद करंदीकर | ANAND KARANDIKAR
आनंद करंदीकर तरुणपणी युक्रांद चळवळीमध्ये सामील झाले. त्यानंतर उदगीर येथे त्यांनी दोन वर्षे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. IIT Mumbai इथून B. Tech व त्यानंतर IIM Calcutta मधून MBA केले व पुढे Ph.d. देखील केले. ‘शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान कसे पोहोचवावे’ हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय राहिलेला आहे. बेरोजगार तरुण आणि जमीन गमावलेले आदिवासी यांच्याबरोबर ते सत्याग्रहात सहभागी झाले; त्या त्या वेळी त्यांना दोन-दोन आठवड्यांचा कारावासदेखील झाला. Marketing and Econometric Consultancy Services (METRIC ) या भारतातील सर्वांत मोठ्या आणि 29 देशांत कारभार असलेल्या व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रवर्तक आणि 25 वर्षे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात त्यांचे वैचारिक लेखन चालूच होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी विषयांवर मराठीतील लोकप्रिय वर्तमानपत्रे व नियतकालिकांतून विश्लेषणात्मक लेख लिहिलेले आहेत.

No products found for this author.
Shopping cart close