प्रत्येक पुस्तकाची विचारपूर्वक निर्मिती ही ‘रोहन’ची खासियत आहे. पुस्तकाची रचना, मजकुराची मांडणी, आवश्यक तेवढया कलात्मकतेची जोड, उत्कृष्ट निर्मितीमूल्य यांचा विषयानुरूप सुरेख मेळ साधताना ‘वाचक’ हा ‘रोहन’साठी केंद्रबिंदू असतो. वाचन करणे हा एक सुखद अनुभव असेल याची खात्री रोहन प्रकाशनाचं प्रत्येक पुस्तक देत असतं. प्रत्येक पुस्तक हे कठीण निकष पार करून तावून सुलाखून निघ्याल्यानंतर वाचकांच्या हाती पोहोचतं.