‘बुक मार्केट ऑफ इराक’मध्ये आपले स्वागत आहे, जिथे रात्रीच्या वेळी देखील पुस्तके रस्त्यावरच असतात कारण इराकी म्हणतात: “वाचणारा चोरी करत नाही आणि चोर वाचत नाही.”
मला माहित आहे की इराकसारख्या संकटग्रस्त देशातून तुम्हाला अशा प्रकारच्या विचारसरणीची अपेक्षा नव्हती, परंतु येथे ते आहे. अल-मुतानब्बी स्ट्रीट किंवा इराक बुक मार्केट जे बगदादमध्ये, अल रशीद स्ट्रीटच्या जुन्या क्वार्टरजवळ आहे. जगात असलेल्या अनेक पुस्तक नगरींपैकी सर्वात अविश्वसनीय आहे आणि आपल्याला नक्कीच अचबिंत करते.
या इराकी पुस्तक बाजाराला ‘बगदादच्या सुशिक्षित आणि बौद्धिक समुदायाचा प्राण’ असे संबोधले जाते. इराकी पुस्तक बाजार हे बगदादचे पहिले पुस्तक व्यापार्यांचे बाजार म्हणूनही ओळखले जात होते. अल-मुतानब्बी स्ट्रीट किंवा इराकमधील पुस्तकांचा कधीही न संपणारा साठा यामुळे, ते मेसोपोटेमियाच्या वर्षभरात कधीही न संपणाऱ्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचे समकालीन साक्षीदार म्हणून प्रसिद्ध होते, कार्यरत होते. अल मुतानाब्बी स्ट्रीट हे इराकमधील पुस्तक बाजार आणि बौद्धिक जीवनाचे केंद्र, त्याच पुनरुज्जीवनाच्या केंद्रस्थानी आहे.
राजा फैझल ने 10व्या शतकातील प्रसिद्ध कवी अबुल तैयब अल-मुतानाब्बी यांच्या स्मरणार्थ अल-मुतानब्बी स्ट्रीटचे नाव दिले. अल-मुतानब्बी जन्म अब्बासी राजवंशांत झाल, ह्याच राजवंशाने आधुनिक इराक ची पायाभारणी केली होती. अल-मुतानाब्बी हे सर्व काळातील महान अरबी कवी मानले जातात. अरबी कवितां म्हणजे त्यांची एक ऐतिहासिक ओळख आहे, कवितेच्या विशाल अन जागतिक क्षेत्रातील एक वैशिष्ट्य आहे.
मी असा आहे की ज्याचे साहित्य अंधांनाही दिसू शकते
आणि ज्यांचे शब्द (अगदी) बाहिऱ्यांनी ऐकले आहेत.
घोडा, रात्र आणि वाळवंट सर्व मला ओळखतात
जसे तलवार, भाला, शास्त्र आणि लेखणी
– अल- मुतन्नबी
इराकमधील पुस्तकांचा बाजार रस्त्यावर सर्वत्र पसरलेला आहे आणि येथे दररोज हजारो लोक जमतात, काही मौल्यवान पुस्तके देवघेव करण्यासाठी. पण पुस्तकांची कोणी चोरी करत नाही, कोणीही पुस्तके हिसकावून घेत नाही आणि पैसे न देता पळून जात नाही. इराकच्या या पुस्तक बाजाराचे हेच सौंदर्य आहे. आणि देशातील हिंसाचाराचे प्रमाण लक्षात घेता हा एक चमत्कारच आहे ना!
दुर्दैवाने, या इराकी पुस्तक बाजाराचा इतिहास दिसतो तितका सुंदर आणि शांत नाही. 5 मार्च 2007 रोजी या बुक स्ट्रीटवर कार बॉम्बचा स्फोट झाला आणि 26 हून अधिक लोक मारले गेले. यामुळे परिसर कचरामय आणि दुकानदारांसाठी असुरक्षित राहिला आणि अनेक व्यवसाय नष्ट झाले. पण स्थानिकांनी आशा सोडली नाही. वर्षभराच्या दुरुस्ती आणि साफसफाईनंतर साहित्याच्या बाबतीत त्याच उत्साहाने रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.
पुस्तकांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असण्याबरोबरच, मुतानाब्बी स्ट्रीट कॅफेसाठी देखील ओळखला जातो. या कॅफेचे नाव आहे “शाबंदर कॅफे”.आणि व्यवस्थापक ‘अल खशाली’ हे एक भन्नाट व्यक्ती आहेत. या इराक बुक मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांनी चार मुलगे आणि एक नातू गमावला. स्वत: अल खशाली आता 85 वर्षांचा आहे आणि त्यांच्या पणजोबांनी 1917 मध्ये पहिल्यांदा कॅफेची स्थापना केल्यानंतर अगदी एक शतक पूर्ण झाले आहे. हे कॅफे बौद्धिक लोकांसाठी त्याच्या वैभवशाली दिवसात एकत्र येण्याचे अतिशय सुप्रसिद्ध ठिकाण आहे. त्यात मुख्यतः इराकी कवी, नाटककार, तत्त्वज्ञ, विरोधक आणि अगदी राजकारणी यांचा समावेश होता. आज, ते त्या काळातील स्मारक आणि एक प्रसिद्ध पर्यटक केंद्र बनले आहे.
इराकी पुस्तक बाजाराला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले नाही तरीही बाजार पुन्हा फुलावा म्हणुन जनताच सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या बुक स्ट्रीटद्वारे पर्यटन आणि पुस्तकप्रेमाला चालना देऊन, बगदाद सुंदर काम करत आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, तरुणांच्या भवितव्यासाठी असे प्रेरणादायी काम करणारे, खरोखर आदरणीय आहेत.
‘वाचणारा कधीही चोरी करत नाही आणि चोर कधीही वाचत नाही’,हाच त्यांचा खरा विश्वास आहे.
माझे एक स्वप्न आहे की,” अशी बाजारपेठ भारतातही असावी!”