Description
निवेदन
मराठी भाषा व साहित्य यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समृद्ध करणे व साहित्य, इतिहास व कला या क्षेत्रांतील महाराष्ट्राचा थोर वारसा जतन करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उद्दिष्ट आहे. ज्यांच्या साहित्य कृतीमुळे मराठी इतिहास, संस्कृती व वाड्मय यामध्ये फार मोठी मोलाची भर पडली आहे, अशा प्रख्यात साहित्यिकांची एकोणिसाव्या शतकांतील व विसाव्या शतकातील पहिल्या जागतिक युद्धाच्या काळापर्यंतची मराठी साहित्यात झालेली उच्च वाड्मयीन साहित्यिक व सांस्कृतिक मूल्ये असलेली पुस्तके व त्या वेळेचे साहित्यिक या विषयीचे ज्ञान मराठी वाचकांस उपलब्ध व्हावे म्हणून त्यांचे साहित्य प्रकाशित करावयाचे धोरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ठरविले आहे. अ्ना तर्हेचे साहित्य मंडळ एकतर स्वतः प्रकाश्रित करते अथवा खाजगी प्रकाशक व साहित्य संस्था यांनी प्रकाशित करावयाचे ठरविले तर मंडळ त्यांना अनुदान देण्याचा विचार करते.
मराठी साहित्यिक तसेच साहित्य यांची शैली कालपरत्वे बदलत व विकसित होत गेली आहे. कविता, कथा, लघुकथा यांचा आशय व आकृतिबंध कालाप्रमाणे बदलत गेला आहे. वर्णनात्मक बदल फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वैचारिक निबंध व प्रबंध यांच्यातील ध्येयवाद व तत्त्वप्रतिपादन यांमध्ये नवीन भर पडली आहे. तसेच जीवनमूल्ये व सामाजिक परिस्थितीतील बदलही प्रकर्षाने जाणवत आहेत. निरनिराळ्या काळातील साहित्यिकांचा त्या त्यावेळच्या परिस्थित्यनुसप आपल्या साहित्यावर ठसा उमटलेला दिसून येतो.
मंडळाने हा हेतू साध्य करण्यासाठी विष्णुश्रासख्री चिपळूणकरांची निबंधमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व मंडळाचे माजी सदस्य, डॉ. वि. भि. कोलते यांजकडे संपादनासाठी सोपविली आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरीतील निवडक लेखांचा संग्रह इंग्रजी व मराठीत संपादन करण्याचे आणि कै. गोपाळ गणेश आगरकरांचे केसरीतील व सुधारकातील निवडक व दुर्मिळ लेखांचे संपादनाचे काम मंडळातर्फे चाळू आहे. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांच्या समग्र वाड्मयाचे संपादन झाले आहे. कै. राजारामशास्त्री भागवत यांचे विविधज्ञान विस्तार सुबोध पत्रिका, हिंदुधर्मविवेचक, दिनबंधू, इत्यादी नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले व आज सहजपणे उपलब्ध नसलेले व महत्त्वपूर्ण निबंधाचे संपादन कार्य मंडळातर्फे चाळू आहे. सिस्टर जेसृल्डिन यांनी संकलित केलेला “Letters & Correspondence of Pandita Ramabai” हा १८८३ ते १९१७ या काळातील आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पत्रव्यवहार मंडळाने इंग्रजी भाषेत प्रकाशित केला असून त्याच्या मराठी अनुवादाचे काम प्रा. सौ. सरोजिनी वैद्य यांजकडे सोपविले आहे. डॉ. के. सी. कऱ्हाडकर यांनी संपादिलेला “बाबा पदमनजी काल व कर्तृत्व” हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
मंडळाच्या या योजनेत आजवर “महात्मा फुले समग्र वाडमय”,“धर्मरहस्य,” या ग्रंथांच्या द्वितीयावृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. “महाराष्ट्र मंहोदयाचा पूर्वरंग”, “सेनापती बापट समग्र वाडमय,” कै. आचार्य धर्मानंद कोसंबी लिखित “जातककथा भाग १, २ व ३ या ग्रंथांचे प्रकाशनही झाले आहे. तसेच कै. आचार्य धर्मानंद कोसंबी लिखित “बुद्धलीला सारसंग्रह”, “बुद्ध धर्म आणि संघ, बुद्ध संघाचा परिचय, समाधीमार्ग” इत्यादी ग्रंथांच्या पुनर्मुद्रित आवृत्त्या लवकरच प्रकाश्रित होत आहेत.
वरील योजनेत प्रस्तुत पुस्तक आम्ही समाविष्ट केले आहे. इतिहाससंशोधक कै. वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेचे ऐतिहासिक व्याकरण तयार व्हावे, या उद्देशाने “ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण” हा निबंध लिहिला. त्याचप्रमाणे मराठी भाषेचा इतिहास उपलब्ध व्हावा म्हणून बीड-पाटांगण येथे सापडलेल्या ज्ञानेश्वरीचे मुद्रण-प्रकाश्नन केले व त्यात निबंधवजा विस्तृत “प्रस्तावना” लिहून त्यात मराठी भाषेचा ऐतिहासिक मागोवा घेतला. हे दोन्ही निबंध आता पुस्तकांच्या बाजारात मिळत नाहीत. ते दोन्ही निबंध पुनः जिज्ञासू वाचकांच्या हाती पडावे म्हणून डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी सविस्तर समीक्षात्मक प्रस्तावना लिहून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या स्वाधीन केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अनेक प्रकल्पांमध्ये मराठीचे पायागुद्ध अध्ययन व्हावे म्हणून मराठी शब्दकोश, मराठी वाड्मयकोश् व मराठी विश्वकोश हे अत्यंत महत्त्वाचे कोश समाविष्ट केले आहेत. भाषेच्या शास्रशुद्ध अध्ययनाचा व्याकरण हा पाया आहे. हा पाया मजबूत होण्यास हे पुस्तक सहायभूत होईल यात शंका नाही. डॉ. तुळपुळे हे प्राचीन मराठीचे नामवंत पंडित आहेत. त्यांनी राजवाडेप्रणीत या दोन निबंधांना उत्कृष्ट प्रस्तावना लिहिली व आवऱ्यक तेथे संक्षिप्त वा विस्तृत टीपा दिल्या. याबद्दल आम्ही त्यांचे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.
लक्ष्मणशास्त्री जोशी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
वाई ३१ जुले, १९७९. श्रावण शके १९०१
महत्वाचे नामोल्लेख
संपादकीय प्रस्तावना
राजवाडे-ज्ञानेश्वरी १;
अनुकूल-प्रतिकूल टीका १;
‘माझी ज्ञानेश्वरी व कित्येक शंकाकार’ ३;
राजवाडे यांची ज्ञानेश्वरीची प्रस्तावना ५;
पूर्ववैदिक भाषा आणि मराठी ७;
ज्ञानेश्वरीचा संस्कृत नवमाघ्याय ८३
मराठी भाषेंचा जन्मकाळ ११;
आद्य मराठी ऐतिहासिक व्याकरणकार १२;
पूर्वप्रयत्न १३;
राजवाडेकृत व्याकरणाची पार्श्वभूमिका १४;
ऐतिहासिक व्युत्पत्तिकार १५;
भाषेची कालकृत अवस्थान्तरे आणि ऐतिहासिक व्याकरण १७;
प्रस्तुत व्याकरणाचे स्वरूप व त्याच्या मर्यादा १८;
विश्वसनीय साधन १९;
भाषेच्या जुनेपणाची काही गमके २१;
आर्य-भारतीय पद्धतीने रचिलेले व्याकरण २३;
मराठीचे ‘संस्कृत’ व्याकरण २५;
आग्रह आणि दुराग्रह २६;
परस्परविरुद्ध विधाने २८;
अ-झास्रपूत टीका ३०;
राजवाडे यांचे भाषाविषयक कर्तृत्व ३१;
देशभक्तीचा बाणा ३४;
भाषाशैली ३५;
थोडे गुणदोष-विवेचन ३६;
समारोप ३९.
Reviews
There are no reviews yet.