Availability: In Stock

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (इ.स.१८१८ – १८८४) – डॉ. वि. गो.खोबरेकर

Original price was: ₹210.00.Current price is: ₹0.00.

Store
0 out of 5

संक्षिप्त प्रस्तावना 

विषयावरील प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांची माहिती अभ्यासुंसाठी देत आहे. महाराष्ट्रारात इंग्रजी सत्ता आल्यानंतर म्हणजे १८१८ पासून १८८५ पर्यंत ठिकठिकाणी सशस्त्र लढे झाले. त्यांत १८५७ चा लढा सर्वांत मोठा होता. त्या अगोदर खानदेशातील भिल्ल, पुणेसाताऱ्याकडील रामोशी यांच्या ७/८ वर्षे सतत चाललेल्या लढ्यांनी इंग्रजांना त्रस्त केले. कित्तुरचे बंड, सावंतवाडी, कोल्हापूर येथील गडकऱ्यांचे लढे हेही सशस्त्र होते. ब्रिटीशांनी हेही लढे वेळीच निपटून काढले. १८५७ साली कोल्हापूर, सातारा, मुंबई, नागपूर, खानदेश, नाशिक, औरंगाबाद, जमखिंडी, सुरपूर या ठिकाणी सशस्त्र लढे झाले. तेथील एतद्देशिय सैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध हे सशस्त्र लढे केले. ह्या लढ्यांच्या इतिहासाची साधने शोधून प्रसिद्ध करण्यासाठी त्यावेळचे केंद्रिय शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या आध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची एक समिती नेमली होती. त्या समितीकडे १८५७ च्या इतिहासाच्या लेखणाचे काम सोपविण्यात आले, तसेच केंद्रशासनाने मुबंई, मध्येप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब इत्यादी सर्व राज्यांना राज्यस्तरीय इतिहास समित्या नेमण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने इतिहास समित्या नेमल्या. त्यावेळच्या मुंबई सरकारने जी इतिहास समिती नेमली होती त्या समितीने मुंबई दप्तरखान्यातील ह्या विषयावरील कागदपत्रे तपासून “सोर्स मटिरियल फॉर द हिस्टरी ऑफ फ्रीडम मोव्हमेंट इन इंडिया”नावाचा १८१८ ते १८८५ या कालखंडातील अप्रसिद्ध कागदपत्रांचा खंड प्रसिद्ध केला. ही सर्व कागदपत्रे पूर्वी कॉन्फीडेन्सीयल म्हणजे गुप्त होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाने त्यांची गुप्तता काढून टाकली. या रेकॉर्डमधून सरकारी दप्तरखान्यातील हस्तलिखित ग्रंथ विशेषतः पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूम्स तसेच पुणे येथील दप्तरखान्यातील पत्रव्यव्हार ही निरनिराळ्या वेळच्या लढेाची माहिती पुरवितात.  नागपूर लढ्याच्या माहितीसाठी श्री. या. मा. काळे यांचा नागपूर प्रांताचा इतिहास व वऱ्हाड प्रांताचा इतिहास तसेच नागपूर रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स्‌ भाग ३ हे उपयोगी आहेत.  इनाम कमिशन स्थापून इंग्रज सरकारने इनामदारास कसे लुबाडले याची माहिती “मुंबई इलाख्यातील इनाम कमिशन खात्यातील गैर इन्साफ”या सन १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत मिळते. लोकहितवादींचे लेखसंग्रहही या बाबतीत खूप माहिती देतात. 

महाराष्ट्रातील व्यापर धंदे इंग्रजांनी कसे नष्ट केले या संबंधीची माहिती पुणे येथील डेक्कन कमिशनर्स रेकॉर्डस्‌, सिलेक्शन ऑफ पेपर्स फ्रॉम द रेकॉर्डस ऑफ इंडिया हाऊस, व्हॉ. ३, ४, १८३१- ३२ चे पार्लमेंटरी पेपर्स चॅप्लीन व एल्‌ फिन्स्टनचे रिपोटर्स, मुजुमदारकृत पेशवाईनंतरचा पुण्याचा इतिहास इत्यादी प्रसिद्ध अप्रसिद्ध साधने देतात. 

भिल्लांनी १८१८ ते १८३१ पर्यंत सशस्त्र उठाव करून ब्रिटीशांना हैराण केले होते. कित्तूरच्या उठावाची माहिती १८२४ ते १८३० या कालखंडातील पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूमस्‌ देतात. रामोजी  पुणे- सातारा जिल्याह्यातील रामोशांनी १८२४ ते १८३१ पर्यंत इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करून इंग्रजांस जेरीस आणले. रामोशांच्या बंडातील प्रमुख उमाजी नाईक यास ज्या कॅ्टन मॅकिन्टॉशने पकडले त्याने रामोशांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहून ठेवलेला आहे. तसेच त्या त्या वर्षीच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये या रामोशांच्या ठिकठिकाणच्या उठावांची माहिती सापडते. सावंतवाडी व कोल्हापूर येथील गडकऱ्यांनी केलेल्या उठावांची माहिती त्या त्या वर्षीच्या पोलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये तसेच कोल्हापूर व पुणे येथील दप्तरखान्यात सापडते.  १८५७ मध्ये महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी एतद्देशीय सैनिकांनी जे सहस्त्र उठाव केले त्याची माहिती मुंबई दप्तरखान्यातील पोलिटिकल डिपार्टमेंट व्हॉल्यूममध्ये सापडते.  

१८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण  दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.

डॉ. वि. गो. खोबरेकर

Digital Book

Book info


3 in stock

  Ask a Question
Share...

Description

निवेदन

१८१८ साली पेशवाईचा अस्त होऊन महाराष्ट्रात इंग्रजी राजवट प्रस्थापित झाली. गुलामगिरीची चीड असलेल्या नागपुरच्या अप्पासाहेब भोसल्यांनी अयशस्वी प्रतिकार केला आणि दोन वर्षे त्यांचा पिच्छा पुरवणार्‍या इंग्रजांच्या फौजेच्या हाती तुरी देऊन ते निसटले. खानदेशातील भिल्लांनी ही तेरा वर्षे इंग्रजांशी झुंज दिली. बीडचे धर्माजी प्रतापराव, नांदेड जिल्ह्यातील हंसाजी नाईक हटकर, कित्तुरची रणरागिणी चन्नस्मा, कित्तुरचे रायप्पा या शुर  स्त्रीपुरषांनीही इंग्रजांविरुद्ध निकराचा लढा दिला. उमाजी नाईक, सावंतवाडीचे आत्मा चौकेकर, राम सावंत, फोंडसावंत कोल्हापूरचे गडकरी तसेच चिमासाहेब भोसले यांनीही इंग्रजांना निमुटपणे शरण जाण्याचे नाकारले आणि पराक्रमाची शर्थ केली.

सातारकर छत्रपतींचे निष्ठावंत सेवक रंगो बापुजी यांनी छत्रपतींचे वकील म्हणून १५ वर्षे विलायतेत वास्तव्य केले. सनदशीर उपाय निष्फळ ठरलेले पाहून रंगो बापूजी हताश झाले नाहीत. १८५७ च्या उठावात रंगो बापुजी गुप्ते आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या लढ्यास अपयश आले. काहींना ज्ञातवास किंवा कारावास पत्कारावा लागला तर काहींना फासावर चढवण्यात आले. १८५७ साली मुंबईतही उठावाचे पडसाद उमटले तसेच खानदेशातील काजीसिंग या भिल्ल नेत्यानेही सशस्त्र लढा दिला. नागपूर, औरंगाबाद येथेही इंग्रजांना प्रतिकारास तोंड द्यावे लागले. नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांना इंग्रजांनी फाशी दिले तर जमखंडीचे संस्थानाधिपती रामचंद्रपंत पटवर्धन यांना नजरकैदेत पडावे लागले.

१८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण  दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.

डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात १८२८ ते १८८४ या काळातील महाराष्ट्रातल्या स्वातंत्रयालढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. ती प्रेरणादायी ठरेल असे वाटते.

डॉ. य. दि. फडके, अध्यक्ष, महाराष्ट्रात राज्य साहित्य संस्कृती मंडळ

२३ मार्च १९९५ 

१८५७ चे मुंबईतील पडसाद

१८५७ च्या उठावाच्या वार्ता मुंबईमध्ये धडाक्याने धडकत होत्या. मीरतची कत्तल, दिल्लीचा नाकेबंदी आणि क्रांतीसैनिकांनी दिल्लीचा घेतलेला ताबा या सर्व प्रकारामुळे मुबंईतील गोर्‍या लोकांची धाबा दणाणली आणि मुंबईत असाच प्रकार झाला तर आपल्या हितसंबंधांना बाध येईल, आपला व्यापार कोसळून पडेल, अश्या भीतीने मुंबईच्या जीवनांत अग्रेसर असलेल्या आणि आपल्या लांगूलचालनामुळे इंग्रजांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या मुंबईकरांनी भराभर सभा घेतल्या. त्या सभांतून शूर सैनिकांची निदा केली, इंग्रजांचे गोडवे गायिले आणि आपण इंग्रजी राज्यामध्ये अत्यंत सुखी आहोत आणि इमानी नागरिक म्हणून राहू इच्छितो अशा प्रकारचे विनंतीअर्ज सह्यांनिश्ञी त्यावेळचे गव्हर्नर एल्फिन्स्टन यांजकडे पाठविले.

सरकारशी असलेले हितसंबंध गोत्यात येतील म्हणून या लोकांनी तसे स्पष्ट लिहून सरकारला आम्ही वाटेल त्या प्रकारचे साहाय्य करण्यास तयार आहोत अश्याप्रकारची ग्वाही देणारा फतवा तयार केला व तो गव्हर्नरकडे पाठविला. त्या फंतव्यावर सही करणारे सर्व जातीचे लोक होते. हिंदु होते, तसेच पारशी, मुसलमान, यहुदी व ख्रिश्चनही होते. यांत प्रामुख्याने डॉ. भाऊ दाजी, आबाजी बापूजी, नारायण दाजी, नवरोजी फ्रामजी, कावसजी जहांगिर, कवसजी जमक्षेटजी, काझी महंमद युसूफ अशा एकंदर सुमारे ५०० नागरिकांच्या सह्या होत्या.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (इ.स.१८१८ – १८८४) – डॉ. वि. गो.खोबरेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.