एस. एल. भैरप्पा
संतेश्वरा लिगन्नैया भैरप्पा किंवा एस. एल. भैरप्पा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1931 रोजी हसन जिल्ह्यातील चन्नरायपटना तालुक्यातील संतेशिवरा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हा प्रदेश, त्याचे जीवन आणि संस्कृती त्यांनी लेखनामध्ये सादर केली गेली आहे. कोणतीही अस्सल चव न गमावता त्यांनी एक प्रादेशिक स्तर सार्वत्रिक केला हे भैरप्पा यांचे कर्तृत्व आहे. त्यांचे वडील कुटुंब सांभाळण्यात उदासीन होते. त्यांच्या आई गौरम्मानेच आठ मुलांचे कुटुंब वाढवण्याचा त्रास सहन केला , भैरप्पा तिसरे होते. प्लेगच्या त्या स्वतः बळी ठरल्या. भैरप्पांच्या चरित्राची प्रेरणा, शिकवण आणि घडण त्यांच्या आईच, त्या एक पापभिरू, धर्मनिष्ठ स्त्री होत्या. कधीही न संपणाऱ्या कामांमध्ये त्या त्यांला महाभारत सांगायच्या आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची महान रचना – पर्व, जी त्यांनी तिलाच प्रेमाने समर्पित केली आहे.
भैरप्पा यांच्या धाडसी, धैर्यवान आणि लढाऊ सहनशिलतेची आणि कष्टाची मर्यादा अनेक घटनांनी स्पष्ट होते; ते पंधरा वर्षांचे असताना त्यांना आपल्या भावाचा मृतदेह खांद्यावर वाहून नेऊन वाळलेल्या झुडपांनी अंत्यसंस्कार करावे लागले. शरीर-प्रपंच्यासाठी छोट्या शहरातील एका छोट्या हॉटेलमध्ये त्यांला वेटर म्हणून काम करावे लागले. त्यांनी अगरबत्ती विकणारा सेल्समन म्हणुन काम केले. गावातील आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांला सरबत विकावी लागली. गावातील तंबू सिनेमात त्यांनी तिकीट तपासणीस आणि द्वारपाल म्हणून काम केले. सरते शेवटी बॉम्बे सेंट्रल मध्ये रेल्वे पोर्टर म्हणून काम केले.
भैरप्पा यांची पहिली कादंबरी भीमकाया ही महाविद्यालयीन विद्यार्थी असताना प्रकाशित झाली होती. 1958 पासून आजपर्यंत त्यांच्या कादंबऱ्या प्रवाहात टिकुन आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख करण्यासाठी वंशवृक्ष (1965) हे आनुवंशिकता या विषयाशी संबंधित आहे. या कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर लेखकानेच केले आहे. गृहभंग (1970) ही एक प्रकारची आत्मचरित्रात्मक कादंबरी. पर्व (1979) मध्ये आपण आपल्या एका महाकाव्यावरचे शास्त्रोक्त भाष्य पाहतो, तंतू (1993) ही एक समकालीन राजकीय जीवनावरिल महाकादंबरी आहे त्यात सामाजिक आणि बदलत्या मूल्यांचा आरसा आहे. सार्थ (1998) ही एक सुंदर, ऐतिहासिक कादंबरी आहे जी आठव्या शतकाची पुनर्निर्मिती करते. मंद्रा (2002) एक संगीतमय कादंबरी, अवराणा (2007) ही त्यांची दुसरी ऐतिहासिक कादंबरी असून त्यात मोगल काळाशी संबंधित आहे. त्यांच्या आठ कादंबऱ्या इंग्रजीत अनुवादित आहेत
अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या वाट्याला आले आहेत त्यापैकी काही म्हणजे भारतीय ज्ञांनपीठ, भारतीय भाषा परिषद पुरस्कार , एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार , गुलबर्गा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट आणि म्हैसूर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ई.
. एखाद्या आख्यायिकेची ओळख कशी करून द्यायची ? अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक, भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून, साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते. लेखनमर्यादा आडवी येते.