Timb (टिंब)

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्‌भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. 

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 

रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

[email protected]

श्री.ना. पेंडसे – श्रीपाद नारायण पेंडसे

आपल्या कथा कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. श्री.नां. यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत  कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.

[email protected]

एस. एल. भैरप्पा

अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्‍या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक,  भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून,  साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात  करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते. 

Shopping cart close