हिडन हिंदू १
एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला. मर्त्य जगाचे नियम धुडकावणार्या ओमच्या अतर्क्य भूतकाळाच्या या साक्षात्कारामुळे तिथे असणारा प्रत्येक जण चक्रावून गेला. त्या टीमला असाही शोध लागला की, प्रत्येक युगातल्या इतर चिरंजीव व्यक्तींच्या शोधात ओम होता. ही विलक्षण गुपितं जगासमोर आली असती तर प्राचीन काळापासून चालत आलेल्या धारणांना धक्का बसू शकला असता आणि येणारं भविष्य बदलून गेलं असतं. तर मग, हा ओम शास्त्री आहे तरी कोण? त्याला का पकडण्यात आलं? पृथ्वी त्याचा शोध का घेत आहे? चला तर मग, या उत्कंठावर्धक प्रवासात ओम शास्त्रीची गुपितं, पृथ्वीचा शोध आणि हिंदू पुराणकथांमधील इतर गूढ चिरंजीवांची साहसं यांचे आपणही सहप्रवासी होऊ यात.
हिडन हिंदू २
ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २’ मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.”
हिडन हिंदू ३
देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे. पराक्रमी अश्वत्थामाला अनभिज्ञ सोडून, इतर सर्व चिरंजिवी सर्व आघाड्यांवरून निघून गेले आहेत. उरलेले शब्द कुठे लपले आहेत? नागेंद्र त्या सर्वांना शोधून श्लोक पूर्ण करेल की अमर त्याला रोखू शकेल? काळाशी झगडत असलेल्या चिरंजिवीच्या अनपेक्षित रहस्याचा उलगडा…”
पृथ्वी नावाचा एक युवक ओम शास्त्री नामक एका अघोरी साधूच्या शोधात आहे ज्याला काही वर्षांपूर्वी एक अज्ञात स्थळी विशेष सुरक्षेसोबत नजर कैदेत ठेवले आहे. ओम शास्त्रीचा असा दावा आहे की त्याने चारही युगे पाहिलेले असून त्यातल्या बहुतांश गोष्टी त्याला ठाऊक आहेत. पृथ्वी या ओम शास्त्रीचा शोध का घेतो असतो? त्याचा शोध पूर्ण होतो का? सरकारने ओम शास्त्रीला नजरकैदेत का ठेवले आहे? इत्यादि प्रश्नांची उत्तरे म्हणजे या पुस्तक त्रयीची कथा होय.
अक्षत गुप्ता यांच्या “द हिडन हिंदू” त्रयीमध्ये आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम आहे. यामध्ये मुख्य पात्र अमर्यादाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगातली प्रवास कथा उलगडते. गुप्ता यांनी रहस्य, विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत एक विचारप्रवर्तक कथा निर्माण केली आहे हे नक्की!