Timb (टिंब)

गेले लिहायचे राहून

गेले लिहायचे राहून

जनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. ऑक्टोबर १९९२च्या सुमारास मला निरोप आला, “आप को सुखदेवसिंगने मिलने को बुलाया है।” तोपर्यंत सुखा नावाचं प्रकरण वकील म्हणून आमच्या लेखी संपलं होतं. मला हा निरोप आल्यावर कळेना की मला त्याने असा निरोप का दिला असेल?

सुखदेवसिंगाची फाशी आणि त्याच्या वकिलाची संवेदनशीलता…

‘लंपन’ची गोष्ट

‘वनवास’- ‘लंपन’ची गोष्ट

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या’ तरी’ त्या ताज्याच वाटतील. 

शाळकरी वयाचा ‘लंपन’ वर्षांनुवर्ष॑ मनात घर करूनबसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या ल॑प्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस – अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं. सत्यकथेत तीस वर्षांपूवी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे, ज्या उत्सुकतेने आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या ल॑पनच्या  ‘कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.

– पु. ल. देशपांडे 

Jagbharatale Dhatiangan

जगभरातले धटिंगण – निळू दामले

लोकशाहीतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक

आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते. तिथे माध्यमं आहेत. न्यायालयं, विरोधी पक्ष सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते. पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात. असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत. 

त्यातले काही आता थेट हुकूमशहा म्हणून ओळखले जातात, तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्याआड आहेत.असे हुकूमशहा का तयार होतात? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात? जगातल्या निवडक दहा धटिंगणांचा हा प्रवास सांगणारं, लोकशाही देशांतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक. 

अथातो संघ जिज्ञासा

अथातो संघजिज्ञासा- जगभरातल्या .स्व.संघाच्या कार्याची ओळख

  ‘ वरवर कितीही भेद दिसत असले तरी या आंतरिक एकता शक्तीवर जनमानसाचा विश्वास दृढ करत जाणे हे मूलभूत काम आहे असे संघ मानतो.’ ‘ संघाने आपले सारे लक्ष पायाभूत सुविधा( इन्फ्रास्ट्रक्चर )वर म्हणजे व्यक्ती निर्माणावर केंद्रित केले आहे. व्यक्ती चांगली असेल तर कार्य चांगले होणारच.’ ‘संघटित समाजच सर्व प्रकारचे वैभव व सामर्थ्य प्राप्त करू शकतो हे सत्य ओळखून संघाने अध्यात्म ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम प्रारंभ केले.’ संघाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  कामाचे मर्म सांगणारी अशी अनेक वाक्ये संघाचे वरिष्ठ प्रचारक माधव विनायक उपाध्य मधुभाई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या ४८ पानांच्या ‘अथातो संघजिज्ञासा’ या छोटेखानी पुस्तकात ठिकठिकाणी आढळतात.

Shopping cart close