जनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. ऑक्टोबर १९९२च्या सुमारास मला निरोप आला, “आप को सुखदेवसिंगने मिलने को बुलाया है।” तोपर्यंत सुखा नावाचं प्रकरण वकील म्हणून आमच्या लेखी संपलं होतं. मला हा निरोप आल्यावर कळेना की मला त्याने असा निरोप का दिला असेल?
मी दुसऱ्या दिवशी जायचं निश्चित केलं. दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये बातमी होती, की सुखा आणि जिंदाला फाशीचं वॉरंट! माझ्या लक्षात आलं. मी फाशी जाणाऱ्या कैद्याला भेटायला जाणार होते. दुसऱ्या दिवशी मी ‘अंडा सेल’च्या खिडक्यांच्या बाजूला प्रवेश केला. जेलरने तिथे स्टूल ठेवलं. मी आल्याचं पाहताच सुखा मला भेटायला आला. खिडकीच्या एका बाजूला तो हसतमुखाने उभा होता.
त्याने हात जोडले आणि तो मला म्हणाला, “आप आयी इसलिए धन्यवाद। आपने हमारी केस चलायी। नहार सर को प्रणाम। हम तो अब चले। बस, दो दिन में फाँसी का फंदा होगा। लेकिन आप को प्रशाद के लिए बुलाया है।” त्याच्या सांगण्यावरून तिथल्या सेवकाने एक बुंदीचं पाकीट आणलं. ती शुद्ध तुपातली ताजी बुंदी होती. सुखदेवने ते पाकीट माझ्या हातात दिलं.
तो म्हणाला, “हम चलनेवाले हैं। इसका प्रशाद आप को दिया।” माझ्या तोंडून शब्द फुटेना. मी त्याच्या हाताला सांत्त्वनाचा स्पर्श केला तो पहिला आणि शेवटचा. तिथून मी बाहेर पडले. काही दिवसांत, मला वाटतं तो १० ऑक्टोबर १९९२चा दिवस होता. पेपर उघडला. पहिल्या पानावर मोठी बातमी : ‘जनरल वैद्यांच्या मारेकऱ्यांना फाशी!’ जनरल वैद्यांच्या हत्येला न्याय मिळाला होता हे योग्यच. सुखदेव हा जनरल वैद्यांचा मारेकरी फासावर गेला, पण त्याच वेळी माझ्या डोळ्यांत अश्रू आले ते सुखदेवसिंग नावाच्या…
कोर्टाच्या आतलं वेगळं जग… जिथे न्यायाधीश, वकील, पक्षकार, साक्षीदार, आरोपी, नातेवाईक असतात. त्या सर्वांच्या मानसिक आंदोलनाचं संवेदनशील वर्णन वाचकाला या पुस्तकात सापडतं. जरूर वाचावं असं पुस्तक!
मूळ किंमत : रु. 200/-
सवलत किंमत : रु. 160/-
संपर्क : 93709 79287