c

फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन

Share...

पुस्तक : फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन  लेखक : अनिल लांबा पृष्ठ संख्या : १४३ 


गुंतवणुकीचे पर्याय

पर्सनल फायनान्स अर्थात वैयक्तिक अर्थव्यवहाराचा सगळ्यात पहिला मंत्र कोणता असेल तर लवकर गुंतवणूक सुरू करणे.गुंतवणूक करणे म्हणजे आपले पैसे अशाच पर्यायात गुंतवणे की ज्यातून आपले उत्पन्न वाढत राहील.

आपल्या समोर गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतात, त्यांपैकी काही पर्यायांचे कॉम्बिनेशन करणे उचित ठरते. परंतु बऱ्याच वेळेस या गुंतवणुकी लाभदायक ठरणार आहेत किंवा नाही ह्याची खात्री देणे हे एक जिकिरीचे काम होऊन जाते.

आपल्या समोर गुंतवणुकीचे परस्परविरोधी अनेक पर्याय असतात. दीर्घकालीन मुदतीत गुंतवणूक करावी की अल्पकालीन, जास्त जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवावा की कमी जोखीम असलेला पण सुरक्षित पर्याय निवडावा? स्थावर मालमत्ता, समभाग, रोखे की मुदत ठेव?

गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायाचे फायदे असतात तसे तोटेही. पण अनेकदा, अनभिज्ञ गुंतवणूकदाराला या पर्यायातून कोणता पर्याय निवडावा हे उमजत नाही. परंतु समजूतदार व्यक्तीने गुंतवणूक नियोजनाला कधीच कमी लेखू नये.

गुंतवणुकीतला लाभ हा ज्याच्या त्याच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. जोखीम घेऊ न इच्छिणाऱ्या व्यक्ती मुदत ठेवी, पोस्ट ऑफिसच्या योजना, सरकारी रोखे यांत गुंतवणूक करतात. जोखीम घेऊ शकणारे लोक शेअर्समध्ये (समभाग) पैसे गुंतवतात.

या दोन्ही प्रकारांतून सुवर्णमध्य साधू इच्छिणारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात आणि जे अतिधाडसी आहेत ते डेरिवेटिव्ह, कमोडिटी किंवा करन्सी यात खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात. मात्र, भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल आपण विसरू शकत नाही.

याव्यतिरिक्त आपले स्वतःचे घर असावे हे एक स्वप्न असते आणि काही जणांना स्थावर मालमत्तेतही गुंतवणूक करावीशी वाटत असते. तसेच प्रत्येकाच्या करदायित्वाप्रमाणे, मिळकत करात सवलत मिळेल अशा पर्यायातदेखील गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

जोखीम विरुद्ध परतावा

बऱ्याच लोकांना जोखीम आणि परताव्याचे गणित माहीत असते. जितकी जास्त जोखीम तितका जास्त परतावा आणि जास्त परतावा जर हवा असेल तर जास्त जोखीमही घ्यावी लागते. पण हे समीकरण त्यांना गोंधळात टाकते. लोभापायी आपण जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीकडे आकर्षित होतो परंतु सारासार विवेक बुद्धीने विचार केल्यास आपली घामाची कमाई सांभाळणे हेही गरजेचे असते.

तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीपासून काय अपेक्षा आहेत हे आधीच ठरवणे महत्त्वाचे आहे. जे. कॉनफिल्ड मोर्ली म्हणतात, ‘गुंतवणूक केलेल्या पैशावर किती व्याज मिळावे हे तुम्हाला चांगलं खायचं आहे की सुखात झोपायचं आहे यावर अवलंबून असतं.’

महागाई

महागाईमुळे होणारे दुष्परिणाम समजून घेणे फार गरजेचे आहे. मुख्यतः निवृत्त लोकांसाठी हा कळीचा मुद्दा ठरतो, कारण सर्वजण नोकरी करताकरता निवृत्तीच्या टप्प्यावर पोहोचणार आहेत. सामान्यतः महागाईने खर्च करण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे व बचत करण्यास प्रतिबंध करायला हवा. कारण भविष्यात जे पैसे आपण खर्च करणार असू, ते पैसे आपण खर्च केले तर, त्याच पैशाचे मोल अधिक ठरेल. अमेरिका आणि इतर काही श्रीमंत देशांत बचतीवरचे व्याजदर खूप कमी असल्याने तिथे नेमके हेच घडते आहे.

पण हे असे त्याच देशात शक्य आहे जिथे बेरोजगारीचा दर कमी आहे आणि बेरोजगारांना सामाजिक सुरक्षा भत्ता दिला जातो. भारतात या सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने आपल्याला अडीअडचणीच्या वेळी व वृद्धापकाळात मदत व्हावी यासाठी पैशाची बचत करणे आवश्यक आहे.

हे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक -नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने,अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.

  • पुस्तकं काय समजून घेताना…?
  • कोणतं मार्गदर्शन करतं?
  • फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती
  • वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?
  • चक्रवाढ व्याज एक महाशक्ती
  • ’शेअरमार्केट’मधील शिरकाव
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
  • पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय
  • क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT ) असे नवे पर्याय
  • गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे
  • आयकरातील कर सवलती
  • प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *