Availability: In Stock

महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

SKU: mh25

Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.

गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

Book info


1000 in stock (can be backordered)

  Ask a Question
Share...

Description

महात्मा गांधींनी भारतवर्षाच्या स्वातंत्र्याची चळवळ ज्यावेळी सुरु केली, त्यावेळी त्यांच्या हाती अशा तऱ्हेची एखादी शक्तिही नव्हती अथवा लोकनियंत्रण करण्याचा एखादा जवरदस्त अधिकारही नव्हता. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून उफाळणारे तेज मात्र विलक्षण शोभायमान व संगीताने परिपूर्ण भरलेले असे होते ! इतरांवर या तेजाचा एवढा प्रचंड प्रभाव पडण्याचे कारण म्हणजे त्यांत सामावलेली स्वयंस्फूर्तीने आत्मसमर्पण करण्याची शक्‍ती हेच होय! याकरताच तर भारतीय जनतेला त्यांच्यामध्ये जी एक क्लिष्ट प्रसंग सहजरीतीने हाताळण्याची हातोटी दृष्टीस पडते तिचे विशेष महत्त्व वाटत नसून त्यांच्या स्वभावात जो एक निर्भेळ व निर्व्याज सत्याचा आविष्कार झालेला आहे त्याचेच खरे कौतुक वाटते. व्यावहारिक राजकारण हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र असतानाही ज्यांचे चैतन्य मानवी स्वभावाच्या चित्रविचित्र आविष्कारांना पुरून उरते आणि सांसारिक जीवांना अनंत प्रज्ञेतून उगम पावणाऱ्या प्रकाश किरणांच्या दिशेने अभिमुख करते, अशा महात्म्यांच्या कोटीत लोक त्यांना बसवू पहातात, त्यातीलही रहस्य हेच आहे.

बंगाली आवृत्तीची प्रस्तावना (१२ फेब्रुवारी १९८४)

महात्माजीं संबंधी रवीन्द्रनाथांनी निरनिराळ्या प्रसंगी जे कथन केले अथवा लिहिले ते त्या त्यावेळच्या पत्रांतून अगर पुस्तकातून निवडून घेऊन या ठिकाणी संकलित केले आहे.

 बंगाली सं. १३३८ व १३४४ (इ. स. १९३१ व १९३७) या साली शांतिनिकेतनात महात्माजींच्या जन्मोत्सवप्रसंगी रवीन्द्रनाथांनी जी प्रवचने दिली, तीच “गांधीजी” व “महात्मा गांधी” या प्रबंधाचे  मूळ होत.

हिंदूंमधील मागासलेल्या जातींचा एक स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करून हिंदूसमाजाच्या निरनिराळ्या घटकात पडलेली फूट कायद्याने पक्की करून टाकण्याचा प्रयत्न जेव्हा करण्यात आला, त्यावेळी हे अरिष्ट टाळण्याकरता बंगाली संवत्‌ १३३९ (इ. स. १९३२) साली महात्माजींनी प्राणान्तिक उपोषण आरंभिले; या संकटसमयी शान्तिनिकेतनातील आश्रमवासीयांना उद्देशून रवीन्द्रनाथ जे बोलले ते “आश्विनी चतुर्थी” व “महात्माजींचे पवित्र व्रत” या दोन लेखात ग्रथित झाले आहे. महात्माजींच्या उपवासाचे प्रसंगी त्यांचे दर्शन घेण्याच्या उत्कंठेने रवीन्द्रनाथ येरवड्याला गेले होते व त्यांच्या उपवासाचे पारणे फेडण्याला तेथे उपस्थित होते; प्रसंगाचे वर्णन या संकलनातील “व्रताचे उद्यापन” या निबंधात आले आहे.

महात्माजींच्या येत्या वाढदिवशी आनंदोत्सवाचे अर्घ्य म्हणून या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी मनातील इच्छा, पण त्यांच्या अपमृत्युनंतर अश्रूंचे तर्पण करण्याकरता म्हणून आज हे हाती घ्यावे लागत आहे!

या पुस्तकाच्या विक्रीचे धन महात्माजींच्या स्मारक-निधीस अर्पण होईल.

२९ माघ १३५४ (बंगाली वर्ष)

(१२ फेब्रुवारी १९४८)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.