Description
इ. स. १८९७ साली पुण्यात प्लेगच्या साथीने कहर केला होता. ह्या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारने मि. रॅन्ड, आय्, सी. एस्, आणि ले आयर्स्ट अज्ञा दोन लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. त्यांनी पुणेकरांचा अनन्वित छळ केला. त्याचा वचपा काढण्याची संधी महाराणीच्या हीरक महोत्सवी समारंभाने आणून दिली. ह्या वर्षीं व्हिक्टोरिया राणीच्या राज्यकारभाराचे ६० वें वर्ष होते म्हणून त्याचा हीरक महोत्सव ब्रिटीश साम्राज्यांत अतिशय दणक्याने साजरा होत होता. पुण्यासही गणेडखिंडीत राजभवनवर यथोचित समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभात इतर अधिकाऱ्यांबरोबर रॅन्ड आणि आयर्स्ट यांनीही भाग घेतला होता.
हे दोघे अधिकारी समारंभाहून परत येत असता दामोदर हरि चापेकर आणि त्यांचे बंधू वाळकृष्ण यांनी परकीय ब्रिटिश सत्तेस हादरा देण्याच्या हेतूने, पुणेकरांवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या, त्यांची अब्रू घेणाऱ्या दोन उन्मत्त ब्रिटीश अधिकाऱ्यांस गोळ्या घालून ठार केले. ठार मारल्या नंतर चापेकर निमिषार्धात नाहीसे झाले. त्यांचा तपास गणेश द्रविड नांवाच्या चुगलखोराच्या सहाय्याने ब्रिटीश पोलीस अधिकारी सुपरिन्टेंन्डेन्ट ब्रोव्हिन याने लाविला. चापेकर बंधू पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या खुनाचा आरोप ठेवून कोर्टांत खटला भरण्यांत आला. ८ ऑक्टोवर १८९७ रोजी दामोदर हरिकडून हा खून करण्यास ते का प्रवृत्त झाले, त्यासंबंधीची कथन लिहून घेण्यांत आले त्यातूनच या आत्मकथनाचा जन्म झाला. दामोदर हरि यांना १८ एप्रिल १८९८ रोजी सकाळी येरवडा जेलमध्ये फांशी देण्यांत आले.
दामोदर हरि यांनी मोडींत लिहलेले एकंदर ९६ बंद दोन्ही बाजूंनी पाठपोट लिहिलेले आढळतात. १८९८ पासून येरवड्याच्या कारागृहात असलेले हे बंद सन १९५५ मध्यें त्यावेळच्या मुंबई शासनाच्या स्वातंत्र्य संग्राम इतिहास लेखन समितीच्या ताब्यांत आले. ही आत्मकथा बाळबोधीत तयार करून ती आम्ही त्यांच्याच शब्दात मराठी वाचकांस सादर करीत आहोत.
मूळचे कोंकणातले चापेकर नंतर चिंचवडकर झाले, रॅन्डच्या खुनाच्या वेळी दामोदर चापेकरांचे वय २७ वर्षाचे होते. त्यांचे शिक्षण मॅट्रीकपर्यंत झालेले होते. त्यांना आणखी दोन बंधू होते. त्यांच्या मागचा बाळकृष्ण त्याचे वय २४ वर्षाचे व धाकटा बंधू वासुदेव १८ वर्षाचा होता. चापेकर स्वतः कीर्तन करीत असत व त्यांचे दोन बंधू त्यांना त्यासंबंधात साथ देत असत. दामोदर आणि बाळकृष्ण या दोघांची लग्ने झालेली होती. रॅन्डच्या वधाच्या वेळी दामोदरांना एक मुलगा व बाळकृष्णास एक मुलगी होती. दामोदर लहानपणापासून शिपाई बाण्याचे होते तिघेही बंधू तालीमबाज होते आपण लष्करांत जाऊन देडासेवा करावी म्हणून आपली, लष्करांत भरती होण्यासाठी दामोदरनी खूप प्रयत्न केले व पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. आपले काहीतरी वैशिष्ट्य दाखविण्याकडे दामोदर हरि यांचा लहानपणापासून ओढा होता. भारताला परकीयांच्या दास्यातून मुक्त करावयाचे असेल तर प्रत्येक भारतीयाने हिसा, क्रांति आणि स्त्रासञांची नीति आत्मसात करून घेतली पाहिजे अज्ञी त्यांची विचारधारणा होती. हीच शिकवण त्यांनी आपल्या भावास दिली होती. त्यांचा भाऊ बाळकृष्ण याने रॅन्डला ठार मारण्याच्या कृत्यांत त्यांस सहाय्य केले होते.
रॅन्डच्या खुनाचे तपशीलवार कथन चापेकरांनी केलेले आहे. रॅन्डवर ज्या रात्री गोळ्या झाडल्या त्या दिवशी सबंध दिवस हे कृत्य करण्यासाठी आपण कोणती तयारी केली, आपल्या हेतूचा सुगावा लोकांस लागू नये म्हणून कोणती काळजी घेतली आणि शेवटी आपण योजिलेल्या स्तुत्य कृत्यास गजाननाने आपणास साहाय्य करावे म्हणून त्या सुखकर्त्याची प्रार्थना करून आपण हे सत्कृत्य करण्यास कसे निघालो व हे कृत्य कसे केले याबद्दलची साद्यंत वृत्त चापेकरांनी दिले आहे.
चापेकर बंधूंच्या कुमार जीवन मनोरंजक आहेत. चापेकर बंधू विद्यार्थीदशेत असता त्यांनी वडिलांसमवेत कीर्तनाच्या निमित्ताने पुष्कळ प्रवास केला. रायपूरच्या निविड अरण्यात प्रवास करीत असतां त्यांच्या मनांत भयंकर कृत्ये करण्याचे विचार चालू होते. त्यावेळी दोघा बंधूंचे वय अनुक्रमे १५ व १२ वर्षाचे होते. या वयात त्यांना इंग्रज हे आपले कट्टर शत्रू वाटू लागले. त्या वळकट शत्रूस आपल्या घरातून म्हणजे हिंदुस्थानातून हाकलून लावण्यास स्वतःस शरीरवळ व लोकांची मदत ह्या दोन गोष्टींची आवश्यकता त्यांना वाटू लागली. म्हणून चापेकर बंधूंनी सर्वप्रथम शरीर कमविण्याकडे लक्ष पुरविले. सूर्यनमस्कारांस सुरवात करून त्यांनी दर दिवशी १२०० पर्यंत नमस्कार घालून दीड तासांत ५॥ कोस म्हणजे ११ मैलांची दौड करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे त्यांना वडिलांचा रोष पत्करावा लागला. वडील हरदासी व्यवसाय करणारे होते, निर्मळ मनाचे होते.
शरीर शिस्तवद्ध कमविण्यासाठी दामोदर हरीनी बापूसाहेब कुरुंदवाडकर यांना आपणास त्यांच्या तालीमखान्यांत ठेवण्यास विनंती केली त्यांनी नकार दिला म्हणून कोल्हापूरकरांना आपल्या सेवेचा स्वीकार करण्यास विनविले. त्यांचेकडूनही निराझ्ञा झाली. धार येथे वडिलांबरोबर कांहि कामानिमित्त ते गेले असतां तिथे त्यांनी बंदूक नेमबाजीचे शिक्षण घेतले. आपल्याला तुरुंगवास पत्करावा लागणारा हे लक्षांत ठेवून त्यांनी खडतर जीवन जगण्याची तालीम सुरू केली. आपले इप्सीत साध्य करून घेण्यासाठी मोंगलाई मुलखांतून हत्यारे जमविण्याचा उपक्रम चापेकर- बंधूंनी सुरु केला. तसेच लोक जमविण्यास सुरुवात केली. मुले जमावून त्यांस हरतऱहेचे व्यायाम व कवायतीचे खेळ शिकविण्यास सुरुवात केली. गोफण शिकविली, त्यांच्यासाठी मारुती दैवताची स्थापना केली. हत्यारे चालविण्यासंबंधीची व्याख्याने दिली.
Reviews
There are no reviews yet.