Jagbharatale Dhatiangan

जगभरातले धटिंगण – निळू दामले

Share...

…ते लोकशाही मार्गाने सत्तेवर आले अन् हुकूमशहा बनले

लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीलाच पायदळी तुडवणाऱ्या निरंकुश सत्ताधाऱ्यांची ओळख देणारं ‘समकालीन प्रकाशन’चं नवं पुस्तक… 

विधिमंडळात लोकनियुक्त प्रतिनिधी असतात. त्यांच्यात फूट पाडता येते. त्यांना विकत घेता येतं. त्यांना गप्प बसवता येतं. समजा, सर्व विरोधी प्रतिनिधी एकत्र झाले तरीही बहुमत नसल्याने ठणाणा करण्यापलीकडे त्यांना काही करता येत नाही. सत्ताधारी माणूस आणि पक्ष बेकायदा कृत्यं करतात, भ्रष्टाचार करतात, दंडेली करतात. विधिमंडळ त्यांना रोखू शकत नाही. पैसा, कायदा आणि दंडुका यांचा वापर करून माध्यमांचे मालक आणि पत्रकार यांना अंकित करता येतं. ते जमलं की सत्ताधाऱ्याने काहीही केलं तरी ते खपतं. विधिमंडळ, न्यायमंडळ, माध्यमं ही सत्तेवर अंकुश ठेवणारी साधनं निष्प्रभ केली की सत्ताधारी बिनधास्त काहीही करू शकतो… 

लोकशाहीतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक

आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते. तिथे माध्यमं आहेत. न्यायालयं, विरोधी पक्ष सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते. पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात. असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत. 

त्यातले काही आता थेट हुकूमशहा म्हणून ओळखले जातात, तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्याआड आहेत.असे हुकूमशहा का तयार होतात? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात? जगातल्या निवडक दहा धटिंगणांचा हा प्रवास सांगणारं, लोकशाही देशांतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारं पुस्तक.

जगभरातले धटिंगण : निळू दामले मूळ किंमत : रु.200/- सवलत किंमत : रू.160/- 

संपर्क : 93709 7928


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *