Description
निवेदन
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने इ. स. १९६३ जुलैमध्ये महाराष्ट्राचा इतिहास नव्याने उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक संदर्भासह पाच भागांत संपादित करून घेण्याचे ठरविले होते. या योजनेनुसार महाराष्ट्राच्या इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन, मराठा (भाग १ व २) व अर्वाचीन अशा पाच खंडात विभागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्राचीन खंड, डॉ. शां. भा. देव यांनी संपादित केला. मध्ययुगीन इतिहास संपादण्याची कामगिरी डॉ. गो. त्र्यं. कुलकर्णी यांनी पार पाडली. मराठा कालखंड भाग २ चे लेखन डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी केले. इ. स. १७०७ ते १८१८ पर्यंतचा इतिहास कालखंड मंडळाने इ. स. १९८८ मध्ये प्रसिद्ध केला. अर्वाचीन कालखंडाचे प्राध्यापक श्री. राजा दीक्षित यांजवर सोपविले आहे.
मराठा कालखंड भाग १ शिवकालाचा इतिहास (इ. स. १६३० ते १७०७) ह्याचे लिखाण मंडळाने डॉ. वि. गो. खोबरेकर यांजकडे सोपविले होते. ते त्यांनी पूर्ण करून मंडळाकडे प्रकाशनासाठी दिले. प्रस्तुत खंड हा त्याच प्रकल्पाचा भाग होय. डॉ. वि. गो. खोबरेकर यांनी परिश्रमपूर्वक हा खंड लिहून पूर्ण केला याबद्दल त्यांना मंडळातर्फे धन्यवाद देऊन हा खंड वाचकांसमोर सादर करीत आहे.
मधु मंगेश कर्णिक, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
दिनांक ५ जून २००६
ऋणनिर्देश
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महाराष्ट्राचा इतिहास “मराठा कालखंड” (इ. स. १७०७ ते १८१८) भाग २रा हा माझ्याकडे लिहिण्यासाठी सोपविला होता. तो ७८० पृष्ठांचा इतिहास साहित्य आणि संस्कृती मंडळाने इ. स. १९८८ मध्ये प्रसिद्ध केला. त्याच सुमारास महाराष्ट्राचा इतिहास “शिवकाल खंड” (इ. स. १६३० ते १७०७) भाग १ला लिहिण्याची कामगिरी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष ज्ञानतपस्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी माझ्यावर सोपविली हे मी माझे भाग्य समजतो. ह्या कालखंडाचा इतिहास मी लिहून पुरा केला आणि तो छापून प्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे दिला आणि मी तर्कतीर्थांना दिलेल्या वचनातून मुक्त झालो.
मराठेशाहीचा समग्र इतिहास रियासतकार सरदेसाई यांनी रियासतीद्वारा लिहून पुरा केला. रियासतकारांनी मराठ्यांच्या इतिहासाचे दोन भाग केले. पहिला भाग मालोजी भोसलेपासून १७०७ पर्यंतचा. त्यास त्यांनी शिवकालाचा इतिहास असे नाव दिले. दुसरा भाग पेशवे कालखंडाचा तो इ. स. १७०७ ते १८१८ पर्यंतचा. रियासतकार सरदेसाई यांनी मराठेशुहीचा इतिहास मराठी रियासतीच्या द्वारे पाच हजार पृष्ठांत लिहिला व महाराष्ट्रास तरणी करून ठेवले.
रियासतकार सरदेसाई यांच्यानंतर शिवज्ञाहीचा मालोजी राजेपासून ते राणी ताराबाई (१७०७) पर्यंतचा समग्र इतिहास, इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी लिहिला. तो असा (१) मालोजी राजे आणि शहाजी महाराज यांची विचिकित्सक चरित्रे, (२) श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचिकित्सक चरित्र, (३) छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र व (४) श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन “हिंदवी स्वराज्याचा मोंगलाशी झगडा” हे इतिहास लेखन इतिहास अभ्यासकांना ठाऊक आहे.
आदरणीय श्री. स. मा. गर्गे यांनी प्रसिद्ध केलेले रिभ्नासतीचे पहिले दोन खंड व इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांचे वर निर्देशिलेले चार ग्रंथ यांचा उपयोग मी हा शिवकालाचा इतिहास लिहिण्यासाठी केला आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते.
ह्या बाबतीत माझे एकट्याचे श्रम लक्षात घेऊन माझे जिवलग स्नेही कॅ. प्रतापसिंह घोरपडे यांनी हस्तलिखित तपासण्याच्या कामी मला साहाय्य केले याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
पुस्तकातील चित्रांची सीडी माझी सुविद्य नात कुमारी योगिनी हिने करून दिली व माझी दुसरी नात चि. प्राजक्ता, एम.ए. हिने काही मजकूर संगणकावर टाईप करून दिला तसेच माझा पुतण्या डॉ. प्रकाश खोबरेकर, इतिहास संशोधन मंडळातील माझे सहकारी प्रा. कशेळकर, श्री. ज. बा. कुलकर्णी, श्री. शरद चिटणीस, प्रा. डॉ. दत्ता पवार व श्री. राहुल परब या सर्वानी पुस्तकाची मुद्रिते तपासण्यास मदत केली. या सर्वांचे याबद्दल मी आभार मानतो.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी मला ह्या बाबतीत कार्यप्रवण केले, हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करतो. मंडळाचे सध्याचे सचिव श्री. उत्तमराव सूर्यवंशी व त्यांचे सहायक श्री. ज. श. साळवी व श्रीमती छा. दि. गोडांबे यांनी ह्याकामी विशेष लक्ष घातले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. श्ञासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे श्री. मनोहर म. मांदाडकर यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ग्रंथाची मुद्रिते तपासली त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. शेवटी ग्रंथाची छपाई सुबकरीत्या केल्याबद्दल व्यवस्थापक, ज्ञासकीय मध्यवर्ती मुद्रणालय व त्यांचे सहायक यांचे मीआभार मानतो.
वि. गो. खोबरेकर
९, ‘यशोधाम’ रिलीफ रोड
सांताक्रुझ (प.), मुंबई ४०० ०५४
अनुक्रमणिका
निवेदन…
ऋणनिर्देश
प्रस्तावना
- १. शिवपूर्वकाल…
- २. स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ करणारे शहाजीराजे ..
- ३. शिवाजीराजे यांचा जन्म, बालपण व शिक्षण…
- ४. हिंदवी स्वराज्याचा पाया घातला ….
- ५. स्वराज्याचा विस्तार
- ६. दगाबाज अफजलखानाचा वध…
- ७. पन्हाळगडच्या वेढ्यातून धाडशी पलायन…
- ८. स्वराज्याचा कोकणात विस्तार- जिंकलेल्या प्रदेशाच्या स्वामित्वास विजापूरकरांची मान्यता …..
- ९. बादशहाचा मामा शायिस्तेखान यास युक्तीने शासन.
- १०. शिवाजी महाराज आणि जंजिरेकर सिद्दी…..
- ११. शिवाजी महाराजांची सुरत स्वारी.
- १२. कुडाळवर दुसरी स्वारी व सिंधुदुर्गाचे बांधकाम …
- १३. राजा जयसिंगाची शिवाजीराजांवर स्वारी
- १४. राजा जयसिंगाबरोबर शिवाजी राजांची आदिलशाहीवर स्वारी…..
- १५. बादशहाच्या कैदेतून जगाला थक्क करणारे बिनधास्त पलायन…
- १६. पुनरपि मोगलांशी बिघाड (सन १६७०-१६७४)…
- १७. सुरतेवर दुसरी स्वारी (दि. ३ ते ६ ऑक्टोबर १६७०)…
- १८. मोगलाईत आक्रमण वणी, दिंडोरी, साल्हेर काबीज…
- १९. राज्याभिषेक….
- २०. आदिलशाहीत पुन्हआक्रमण …
- २१. कर्नाटकातील मोहीम—दक्षिण दिग्विजय …
- २२. जंजिरेकर सिद्दीशी भांडण…
- २३. मोगलांच्या आक्रमक कारवायांशी मुकाबला-.संभाजी दिलेरखानाकडे जातो …
- २४. शिवाजी महाराजांचे निर्वाण…
- २५. शिवाजी महाराजांची दिनचर्या…
- २६. शिवाजी महाराज आणि युरोपीय राष्ट्रे…
- २७. शिवाजी महाराज आणि इंग्रज संबंध…
छत्रपत्री संभाजी महाराज
- २८. युवराज संभाजी राजांचा राज्यकारभारांत प्रवेश व राज्यप्राप्ती …
- २९. संभाजी महाराज व शहाजादा अकबर…
- ३०. संभाजी महाराज आणि सिद्दी संघर्ष…
- ३१. छत्रपती संभाजी महाराज आणि इंग्रज …
- ३२. संभाजी महाराजांचा पोर्तुगिजांशी झगडा (इ. स. १६८०–१६८४)…
- ३३. स्वराज्यावरील मुघली परचक्र—पश्चिम महाराष्ट्रात मोगलांची घुसखोरी (इ. स. १६८१ ते १६८५)…
- ३४. स्वराज्यावरील मुघली परचक्र-कोकण प्रांतात लढाया (१६८१-८४) भाग १ ला …..
- ३५. स्वराज्यावरील मुघली परचक्र – मराठ्यांशी कोकणात झुंज (ऑगस्ट, १६८३ ते १६८५) …
- ३६. आदिलशाहीचा नाश…
- ३७. कुत्बशाहीचा अंत …
- ३८. संभाजी महाराज आणि कर्नाटक…
- ३९. मराठा-मुघल संघर्ष (इ. स. १६८४-१६८८) …
- ४०. संभाजी महाराजांस पकडण्यासाठी औरंगजेबाचे प्रयत्न व दुर्दैवी शेवट …
छत्रपत्री राजाराम महाराज
- ४१. राजाराम महाराजांचा जन्म, बालपण आणि राज्यप्राप्ती …
- ४२. राजाराम महाराजांचे जिंजीस आगमन आणि राज्यकारभार चालू…
- ४३. राजाराम महाराज जिंजीस असता महाराष्ट्रात स्वराज्य राखण्यासाठी मराठ्यांनी केलेला
स्वातंत्र्य संग्राम (१६९० ते १६९५)
- ४४. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस असता मराठे-मोगल यांचा कोकणातील संघर्ष ….
- ४५. राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यात, भाग १ ला (नोव्हेंबर १६८९ ते फेब्रुवारी १६९३) …
- ४६. राजाराम महाराजांच्या जिंजी वास्तव्यात मराठ्यांच्या कर्नाटकातील हालचाली व जिंजीहून पलायन …
- ४७. महाराष्ट्रात परतल्यानंतर राजाराम महाराजांच्या हालचाली… .
- ४८. ताराबाई काल (इ. स. १७००-१७०७) मराठ्यांची चढती कमान ताराबाईने राज्यकारभार
हाती घेऊन किल्ले लढविले (इ. स. १७०० ते १७०२) … . PDF
Reviews
There are no reviews yet.