गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

Share...

गोपाळ नीलकंठ दांडेकर परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

अशा या व्यक्तिमत्त्वाचा जन्म अमरावतीच्या परतवाड्यातला. सन 1916, 8 जुलैचा. जे काही शिक्षण- शालेय शिक्षण त्यांचे झाले ते सर्वच अमरावती अन तद्पश्चात नागपूर म्हणजेच विदर्भात! कारण अवघ्या तेरा वर्षांचे असताना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांनी घर सोडले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. नागपूरहून त्यांनी थेट मुंबई गाठली. तेथून निघून पढे ते गाडगेबाबांबरोबरही काही काळ राहिले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर इंदौरला राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या कार्यासाठी राहिले. तेथेच प्रकृती खराब होऊ लागल्याने पुर्ण सतरा वर्षांनी त्यांनी पुण्याचा रस्ता धरला आणि आपल्या भावाबरोबर राहू लागले. ह्याच सतरा वर्षान्मध्ये त्यांनी भक्तिमार्गाचाही अभ्यास केला जो लेखनात त्यांना सहाय्यभूत ठरला.

वयाची तीस वर्षे झाल्यावर त्यांनी लग्न करुन ग्रुहस्थाश्रमी आश्रय घेतला. त्यावेळेस झलेल्या आर्थिक ओढाताणीने त्यांना लेखन एक व्यवसाय म्हणून स्वीकारावयास लावले. “आमचे राष्ट्रगुरु” हे त्यांचे पहिले पुस्तक त्यंच्या लग्नाच्याच दिवशी प्रकाशित झाले. त्यानंतर लगेचच त्यांची “शिवबाचे शिलेदार” आणि “गोपाळांचा  मेळा” ही कुमार वाड्मयीन पुस्तके प्रकाशित झाली.

त्यानंतर आली “तुडवलेले घरकुल” आणि “मंगल संसार” पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या “शितू” ह्या कादंबरी मुळे. “शितू” नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही असेच म्हणावे लागेल कारण त्यानंतर जे त्यांच्या लेखणीतून उतरले ते वाचकांना पसंत पडू लागले, नव्हे भुरळ घालु लागले. “शितू, पड्घवली, रानभुली, जैत रे जैत, माचीवरला बुधा, वाघरू त्या एका रुखातळी, त्रिपदी अशी कितीएक नावे घ्यायची ?” 

गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.

हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा‘ ह्या महाराष्ट्रातील गडाकोटांवरील प्रवासवर्णनात्मक पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. ‘किल्ले‘ हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’, ‘रानभुली’, ‘वाघरू त्या एका रुखातळी’ आणि ‘माचीवरला बुधा’ या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे

“कादंबरीमय शिवकाळ” तर केवळ एक पुर्ण वेगळा अध्यायच. त्यांच्या पुस्तकांवर बोलावे तेवढे थोडेच.

त्यांच्या “स्मरणगाथा” ह्या आत्मव्रुत्तपर ग्रंथाला 1976 चा साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला. 1981 चे अकोला येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यानी भुषविले.

आपल्या लेखनकामासाठी  शालेय शिक्षणही अर्धवट सोडलेल्या व्यक्तिमत्त्वास पुणे विद्यापीठसारख्या मह्त्तम शिक्षण संस्थेने डि. लिट. देऊन सन्मांनीत केले. साल होते 1992.

[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *