Timb (टिंब)

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) – एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहरी कुरुंदकर यांनी ओळखलं जातं.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

मारुती चितमपल्ली पुस्तके

मारुती चितमपल्ली लिखित पुस्तके…

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. 

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? 

हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले.

आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. 

नरहर कुरुंदकर कोण होते आणि त्यांचे विचार आजही लागू होतात का?

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.

त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

आपल्याला असलेले प्रश्न संविधानाच्याच चौकटीत सोडावावेत असा त्यांचा आग्रह होता. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू होते.– तुषार कुलकर्णी ( बीबीसी मराठी)

15 जुलै 2020

पुनर्लेखन  15 जुलै 2023

Shopping cart close