Timb (टिंब)

पुस्तके कशी वाचावी?

मानवी इतिहासात ग्रंथलेखनाची नांदी झाल्यावर अनेक उत्कृष्ट दर्जाची अक्षरवाङ्मय गणली गेलेली, मानवी मूल्यांची महत्ता सांगणारी साहित्यसंपदा आपल्या पूर्वसूरींनी निर्माण करून ठेवलेली आहे. लाखो लोकांनी शेकडो वर्षे ती वाचली, त्याची पारायणे केली. मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तरी तुमच्या बेभरवश्याच्या आयुष्यात काही हजारच पुस्तके वाचून होतील. भाराभर वाचनापेक्षा प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी निवडक अशी ज्ञान, माहिती, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद,मार्गदर्शक ठरणारी आणि मनोरंजक  पुस्तके वाचावी. पुस्तक हे ज्ञानरंजनाचे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो.

नुसत्याच सरधोपट वाचनापेक्षा निरक्षिर विवेकाने वाचावे.

संकटग्रस्त ग्रंथालयं

ग्रंथालयं कमी होत आहेत?

वाचक ग्रंथालयात जातात किंवा जात होते कारण तिथं संदर्भ ग्रंथ उपलब्ध होतात. 

ग्रंथालयांची गरज ही वाचन संस्कृती वाढवणं आणि टिकवणं यासाठी आहे. वाचन हा संस्कार आहे आणि तो घडवायचा असेल तर ग्रंथालयांची भूमिका अनन्यसाधारण आहे, पण त्याबरोबरच ग्रंथालयांनी देखील काळानुरुप सातत्याने बदलण्याचं आव्हान देखील आमच्यासमोर आहे, असं पेडगावकर सांगतात.

Shopping cart close