Timb (टिंब)

पुस्तकांचं Online गाव: पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace

पुस्तकांचं असेही एक गाव  असावं की, जिथे नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकंच पुस्तकं आणि अगणित साहित्यीक खजिना सापडेल? आम्ही असेच एक Online नगर वसवीत आहोत पुस्तकांसाठी Online multivendor
Marketplace”
च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात स्वागत आहे!

येथे, आपण पुस्तकांच्या अथांग सागरात, साहित्य विश्वात विश्वासाने डुबकी घ्यावी, इथे कणाकणात साहित्य सुगंध
आढळेल
. आपण पुस्तक संग्राहक असाल, हौशी वाचक असाल किंवा लेखक असाल, हे आपलंच स्वप्न आहे जे सत्यात उतरले आहे.

पुस्तके का वाचावी?

लिखित शब्द संचिताचे सार –  पुस्तके

पुस्तके वाचणे ही एक अमुल्य आणि समृद्ध  करणारी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.

काळ कितीही बदलला तरीही ‘वाचन’ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..

मग ते पोथी असो,पुस्तक असो वृत्तपत्र असो की मासिक असो..

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

ज्ञानी माणसाचा सर्वत्र उदो उदो होतो आणि ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन, मनन, चिंतन हवंच.

संकटग्रस्त ग्रंथालयं

ग्रंथालयं कमी होत आहेत?

वाचक ग्रंथालयात जातात किंवा जात होते कारण तिथं संदर्भ ग्रंथ उपलब्ध होतात. 

ग्रंथालयांची गरज ही वाचन संस्कृती वाढवणं आणि टिकवणं यासाठी आहे. वाचन हा संस्कार आहे आणि तो घडवायचा असेल तर ग्रंथालयांची भूमिका अनन्यसाधारण आहे, पण त्याबरोबरच ग्रंथालयांनी देखील काळानुरुप सातत्याने बदलण्याचं आव्हान देखील आमच्यासमोर आहे, असं पेडगावकर सांगतात.

दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं….

सू लेखिका आहेत, त्यांनी ऑक्सफर्डमधे डॉक्टरेट केलीय, त्या लेख लिहितात, पुस्तकं लिहितात, कॉलेजात शिकवतात. शहराच्या वर्दळीपासून दूर जाऊन लेखन करावं यासाठी  सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या.   गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती मात्र आर्थिक दृष्ट्या सुधारली नाहीत. 

गावात पुस्तकालय नव्हतं. पूर्वी एक पुस्तकालय होतं आणि विभागीय पुस्तकालयातून तिथं बसनं पुस्तकं येत. काही काळानं काही पुस्तकं परत जात, त्या जागी काही पुस्तकं नव्यानं येत., लक्ष न दिल्यानं ती व्यवस्था कोलमडली…

Apte-vachan_mandir

आपटे वाचन मंदिर, १५१ वर्षे!

इचलकरंजी शहरातील एक सांस्कृतिक केंद्र असलेल्या आपटे वाचन मंदिराची स्थापना रामभाऊ आपटे वकिलांनी १८७० मध्ये स्वत:च्या ग्रंथसंग्रहाचे दान करून केली. आपटे वाचन मंदिराचे मूळ नाव ‘नेटीव्ह जनरल लायब्ररी‘ असे होते. इचलकरंजीचे सुविद्य जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी वाचनालयाच्या इमारतीसाठी भरघोस मदत केली. 1910 मध्ये वाचनालयाची इमारत उभी राहिली आणि आपटे वकिलांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे ‘आपटे वाचन मंदिर’ असे नामकरण करण्यात आले.5000 अधिक सभासद असलेले आणि 80000 पेक्षा जास्त ग्रंथांचे भांडार असलेले आपटे वाचन मंदिर म्हणजे इचलकरंजीचे वैभवच आहे.

Iraqi-Book-Street

अल-मुतानब्बी स्ट्रीट- इराक़ी पुस्तक नगरी

तुम्ही चोखंदळ वाचक आहात, २४ तास चालु असलेलं एखादे ग्रंथालय असावे,  आपल्या खोलीत पुस्तकांनी भरलेले एक मोठे कपाट असावे…असे तुमचं स्वप्न असेल तर  ‘बुक मार्केट ऑफ इराक’ तुम्हाला अतिशय आवडेल.

‘वाचणारा कधीही चोरी करत नाही आणि चोर कधीही वाचत नाही’

लेखक घर बांधतो

ख्यातनाम कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी पुण्यात आपल्या मनाप्रमाणे बांधलेल्या ‘अक्षर’ या वास्तूचे अतिशय हृद्य वर्णन त्यांच्या ‘लेखक घर बांधतो’ या लेखात केले आहे.

हे घर साहित्य-कला-संस्कृतीच्या असंख्य मैफलींनी नेहमी निनादत राहिले. आज काळाच्या तकाज्याने लेखकाचे हे घर अस्तंगत होते आहे.  बासष्ट साली घर पुरं झालं. खर्च बावन्न हजार झाला. घराला नाव पाहिजे. मी ते ‘अ क्ष र’ ठेवलं. अक्षरावर घर झालं होतं.

तेव्हा आसपास इमारतींची गर्दी झालेली नव्हती. बरंच रान मोकळं होतं. त्या पाश्र्वभूमीवर माधवरावांनी तयार केलेलं घराचं डिझाइन टुमदार आणि वेगळं दिसे. घर म्हणून त्याचं त्याला खास व्यक्तिमत्त्व होतं. केवळ आडवे उघडे वासे, मध्येच दिसणारा छपराचा भाग

घरातही थोडं ऊन, वारा, पाऊस आला पाहिजे; बाहेरच्या वातावरणापासून आपण एखाद्या बंद पेटीत राहिल्यासारखं राहू नये, म्हणून अंगणवजा हा भाग उघडा होता. माधवरावांचं सांगणं होतं की, या Perforations ची खालच्या भिंतीवर चांगली छाया पडेल.’

सत्तर साली एन. एस. डी.चे अल्काझी एकवार घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘मराठी लेखकाचं इतकं सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहतोय.’’

बेकरायण (Laurie baker)

बेकर यांचं जीवन म्हणजे वास्तुकलेतील एकहाती अबोल क्रांती होती. बेकर यांना अभिप्रेत तत्त्वज्ञान त्यांच्या वास्तूंमधून व्यक्त होत राहिलं. हरित इमारत, पर्यावरणस्नेही बांधकाम, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्यानं काही घडलं असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. 

साधारणपणे 1990 च्या दशकापासून अनेक तरुण भारतीय वास्तुकलेचा अभ्यास नव्याने करू लागले आहेत. या विद्यार्थ्यांकरता बेकर हे आदर्शवत्‌ नायक आहेत. बेकर यांच्या कार्यातून स्फूर्ती घेणारे असंख्य तरुण आहेत. त्यांची वास्तुकला आजही समकालीन वाटते. या तरुणांनी प्रचलित खर्चिक, ऊर्जाग्राही वास्तूंच्या विरोधात मोहीम उघडून पर्यावरणसंवादी रचनांचा प्रसार केला, तर आपली वैयक्तिक व सामाजिक स्पेस अर्थपूर्ण होऊ शकेल. 

– अतुल देऊळगावकर,  लातूर

[email protected]

laurie-baker

लॉरी बेकर हा ‘ब्रिटिश’ मनुष्य ‘भारतीयाहून भारतीय’ होता !’

‘अल्पखर्ची व पर्यावरणसंवादी (लो कॉस्ट अॅन्ड इको-फ्रेन्डली) घर’, या संकल्पनेचे प्रवर्तक मानले जाणारे वास्तुविशारद लॉरी बेकर यांचे 1 एप्रिल 2007 रोजी वयाच्या 90व्या वर्षी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर व सुधाताई गोवारीकर यांचा लॉरी बेकर यांच्याशी परिचय झाला, स्नेह जडला. त्याच काळात गोवारीकरांचे तिरुवनंतपुरम येथील घरही लॉरी बेकर यांनी बांधून दिले. म्हणून सुधाताई व वसंतराव गोवारीकरांना आम्ही विनंती केली लॉरी बेकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगण्याची; त्यातून तयार झालेला हा लेख, खास ‘साधना’च्या वाचकांसाठी…

वसंत व सुधा गोवारीकर

https://weeklysadhana.in/view_article/article-on-laurie-baker-by-vasant-and-sudha-gowarikar

भाऊ पाध्ये (Bhau Padhye)

भाऊंची ओळख

भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. त्यांचा जन्म दादर येथे २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल (दादर), एल कदूरी हायस्कूल (माझगाव) आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल (सँडहर्स्ट रोड), येथे प्रत्येकी एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल (वडाळा) येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली. १९५६ साली शोशन्ना माझगावकर या कामगार संघटनेच्या कार्यकर्तीशी लग्न. ‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ’ (१ वर्ष), ‘नवशक्ति’ (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. ‘नवशक्ती’ सोडल्यावर काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन. ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन. १९८९पासून अर्धांगाच्या आघाताने लेखन अशक्य झालं.

मृत्यू- ३० ऑक्टोबर १९९६

Shopping cart close