Timb (टिंब)

ब्रॅंड काटदरे

ब्रॅंड काटदरे – एक ‘ब्रँड’ घडतो, त्याची कहाणी

काटदरे फुड्सचा प्रवासही वळणावळणाचा, रोचक आणि थक्क करणारा आहे. १९५८ मध्ये छोट्या गावातल्या एका स्वयंपाक घरात या व्यवसायाची सुरुवात झाली. तीन पिढ्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि आज ‘काटदरे’ हा ब्रँड तयार झाला आहे. गेल्या ६७ वर्षातल्या अनुभवाचं संचित म्हणजे हे पुस्तक. त्यामुळेच त्याला एक वेगळं महत्त्व आहे. अशा प्रकारचं अनुभवाचं डॉक्युमेंटेशन होणं हे नव्या पिढीतल्या वाचकांसाठी आणि विशेषतः उद्योजकांसाठी साठी मोलाचं ठरणार आहे.

लेखिका:अपर्णा वेलणकर

“तुंबाडचे खोत” — ‘जगबुडी’ काठी नांदलेल्या एका घराण्याच्या चार पिढ्यांची द्विखंडात्मक दीर्घ कादंबरी

कधी कधी एखादं पुस्तक असं आपल्या हाती लागतं, की सुरुवात करताना आपण फक्त पानं वाचतो, पण थोड्याच वेळात त्या पानांत आपण हरवून जातो. डोळ्यांसमोर चित्रं उभी राहतात, कानात संवाद ऐकू येतात, आणि नकळत आपण त्या कथेमध्ये एक पात्र होऊन जातो. श्री. ना. पेंडसे यांच्या “तुंबाडचे खोत” ह्या दोन खंडांत विभागलेल्या महाकाव्यासारख्या कादंबरीचं अनुभवणं असंच काहीसं आहे.

नरकातला स्वर्ग

‘नरकातला स्वर्ग.’ – मर्मभेदक चित्रण

मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण – ‘नरकातला स्वर्ग.’ भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल… राजू परूळेकर

Heart Lamp by Banu Mushtaq

बानू मुश्ताकना बूकर पारितोषिक

बानू स्वतः मुस्लीम आहेत. एकूणात त्यांना पन्नासेक वर्षाचा मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नाचा धगधगीत परिचय आहे. तो त्यांच्या साहित्यातून येत असतो.

स्त्रियांवर अन्याय कोण करतं? अर्थात पुरुषच. अनेक पुरुष पात्रं बानू मुश्ताक यांच्या कथात आहेत. काही पुरुषांचा थांग लागत नाही, काही पुरुष मारहाण करतात, काही पुरुष चांगलंही वागतात, काही पुरुष भाऊ असतात, काही पुरुष नवरे असतात, काही पुरुष मुल्ला असतात. काही पुरुष ‘शेपूट नसलेली माकडं’ असतात.

Air-Borne

रोगांचा धावता इतिहास पुस्तकात आहे. सुरवातीला रोग दूषित हवेमुळं होत असत असं मानलं जात असे. दूषित हवा म्हणजे दुर्गंधी. ही झाली इसवी सनापूर्वीची गोष्ट. सतराव्या शतकात ल्यूएनहॉकनं केलेल्या प्रयोगानंतर सूक्ष्म जंतूंमुळं रोग होतात हे सिद्ध झालं, मान्य झालं. जंतू रोग पसरवतात, पाण्यातून, स्पर्षातून, पदार्थातून. पण हवेतून जंतू पसरू शकत नाहीत असं साथीचे रोगवाले म्हणत.

Zhou Enlai : A Life

झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र

Zhou Enlai : A Life –  Chen Jian Publication – Harvard

चाऊ एनलाय यांचं ताजं चरित्र पुस्तक लेखक प्रकाशक

झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र प्रकाशित झालं आहे. 

झू (१८९८-१९७६) माओ झेडाँग (पूर्वी माओ त्से तुंग म्हणत) यांचे सहकारी होते, चीनचे पंतप्रधान आणि परदेश मंत्री होते. चीनमधलं सिविल वॉर, स्वातंत्र्य लढा, कम्युनिष्ट पक्षाची स्थापना आणि चळवळ, माओ झेडाँग यांची राजवट या सर्व घटनाचक्रामधे झू सक्रीय होते. – 

अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

निसर्गतः प्राप्त झालेले सुखदायी आयुष्य सोडून दुर्बलांच्या, वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती म्हणजे जणू माणसांमधील देवदूतच. स्वार्थ बाजूला ठेवून समाजातील पीडितांच्या दुःखावर फुंकर घालणारी ही सामान्य माणसेच असामान्य कार्य करून दाखवतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणार्या ‘स्नेहालय’ संस्थेचे डॉ. गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी हे अशाच व्यक्तीपैंकी एक. आपल्या कार्यातून समाजाला सकारात्मकतेच्या ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱ्या या दांपत्याची प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कहाणी ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेघा देशमुख भास्करन लिखित पुस्तकात उलगडली आहे.

 अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम

अक्षत गुप्ता यांच्या “द हिडन हिंदू” त्रयीमध्ये आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम आहे. यामध्ये मुख्य पात्र अमर्यादाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगातली प्रवास कथा उलगडते. गुप्ता यांनी रहस्य, विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत एक विचारप्रवर्तक कथा निर्माण केली आहे हे नक्की!

मिशन सेमीकंडक्टर्स

मिशन सेमीकंडक्टर्स

सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा शोध कसा लागला? निरनिराळे देश यात कसे सामील झाले? इंटेल, ॲपल, हुवावे, सॅमसंग यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांबरोबरच ‘आर्म‌’ सारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपनीची स्थापना कशी झाली? याची रोचक कहाणी डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘मिशन सेमीकंडक्टर्स‌’ या पुस्तकात वाचायला मिळते.

शोध आणि बोध - प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

शोध आणि बोध – प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतुःसूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ. 

 लेखक: रविंद्र अनंत साठे

माझ्या मते माहितीची उपलब्धता हा समाजप्रबोधनाचा महत्वाचा घटक आहे, प्राचीन शेतीविषयक समाजजाणीव, सुसंगत,तपशीलवार माहिती समाजातील जिज्ञासू, विद्यार्थी, शिक्षक,संशोधक व अगदी सर्वसामान्य शेतकरी बंधूंना ह्या पुस्तकाद्वारे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्राचीन शेतीविषयी इतकी सुसंगत, नावीन्यपूर्ण माहिती देणारे मराठी पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्यामुळे मराठी वैज्ञानिक साहित्यात ह्या पुस्तकाद्वारे मोलाची भर पडलेली आहे, असे मला खात्रीने वाटते. –  पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद प्र. मोघे

Shopping cart close