• -100% पठ्ठे बापुराव

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव

    0

    ज्या काळात रंजन आणि प्रबोधन लोककलाच करत, त्या काळी लोकसंस्कृती आणि लोकजीवनाला उत्साहवर्धित प्रेरणा देण्याचे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य तमाशा या मराठामोळ्या लोककलेने केले आहे. खेड्यापाड्यांतील वर्षभराच्या शिणलेल्या, मरगळलेल्या लोकजीवनाला एक नवे चैतन्य लाभे. या लोककलाकारांनी, लोकशाहिरांनी सामाजिक स्तरावर सांस्कृतिक जडणघडण केली आहे. पेशवेकालीन शाहिरांच्यानंतर तमाशा कला मंदावली होती; पण पठ्ठे बापूरावांसारखा शीघ्रकवी या कलेची ब्रत म्हणून सेवा करायला लागल्यानंतर त्यांच्या तमाशांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले. त्यांनी तमाशा कला कळसाला नेऊन पोचवली. त्या कलेला नवा प्राण दिला. तमाशा कला ही त्यांच्या जीवनाचा श्वास बनली होती. त्यांनी लोकरंजनाबरोबर लोकप्रोबधन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. संसार मोडला. उच्चवर्णीय असूनही समाजाची पर्वा बाळगली नाही. गावाने बहिष्कृत केले तरी पठ्ठे बापूरावांनी हाती घेतलेला लोकजागराचा डफ खाली ठेवला नाही. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने तमाशा कलेला बहर आला. एकदा म्हटलेली लावणी उद्या म्हणायची नाही, लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी ठेवली, की लावणी संपल्याशिवाय उचलायची नाही, शिळ्या पैशाचे तोंड पाहायचे नाही अशा या लोकविलक्षण शाहिराच्या लोकविलक्षण प्रतिज्ञा होत्या. संपूर्ण आयुष्यच त्यांनी तमाशा कलेला वाहिले होते. त्यांनी दोन लाखांहून जास्त लावण्या लिहिल्या ही घटनाही जगावेगळी होती.  आजही पठ्ठे बापूरावांच्या गण, गौळणी आणि लावण्यांशिवाय तमाशाची भैरवी होत नाही. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart