Timb (टिंब)

ारतीय नौका नयनाचा इतिहास

‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ – डॉ. द. रा. केतकर

डॉ. केतकरांनी ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ प्राचीन काळ, मराठा आरमार (मध्ययुगीन कालखंड) आणि ब्रिटिश साम्राज्य काळ (म्हणजेच पेशवाई अस्ताला गेल्यानंतर साधारणपणे १८१८ ते १९४७ स्वातंत्र्य मिळेपर्यंत ) अशा तीन भागात मांडला आहे. सिंदिया स्टीम आणि इतर कंपन्यांसंबंधी विस्तृत माहिती वाचकाला तिसऱ्या भागात मिळते. 

भारतीय नौकानयनाचा स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा समग्र इतिहास या एका ग्रंथात अभ्यासकाला मिळतो. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून याचे मोल जास्त आहे.

अरुण भंडारे 

The Golden Road: How Ancient India Transformed the World

भारताचा सुवर्ण काळ – निळु दामले

The Golden Road: How Ancient India Transformed the World -William Dalrymple (Bloomsbury)

भारताचा इतिहास अनेक इतिहासकार आणि संशोधकानी मांडला आहे. भारतात एकेकाळी वैभव होते हे बहुतेक सर्वानी मान्य केलं आहे. विल्यम डॅलरिंपल तेच या पुस्तकात मांडतात, पण आजवर ठळकपणे न मांडले गेलेले काही पुरावे ते या पुस्तकात वाचकांसमोर ठेवतात.उदा. रोममधे सापडलेले लेखी पुरावे. डॅलरिंपल यांची शैली रंजक आहे हे, नाट्यमय आहे. पण नाट्यमयतेच्या नादी लागून पुराव्यांपासून ते दूर जात नाहीत. थोडक्यात म्हणजे ते कादंबरी किवा नाटक लिहीत नाहीत, इतिहासच लिहितात.

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र – डॉ. सदानंद मोरे

पाने :  300 मुल्य (₹): 350.0

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे असे समजून त्याला देव्हाऱ्यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारुपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसऱ्यात तो अनुकरणीय आदर्श बनतो. –महेश नाईक

Shopping cart close