अथातो संघजिज्ञासा- जगभरातल्या .स्व.संघाच्या कार्याची ओळख
‘ वरवर कितीही भेद दिसत असले तरी या आंतरिक एकता शक्तीवर जनमानसाचा विश्वास दृढ करत जाणे हे मूलभूत काम आहे असे संघ मानतो.’ ‘ संघाने आपले सारे लक्ष पायाभूत सुविधा( इन्फ्रास्ट्रक्चर )वर म्हणजे व्यक्ती निर्माणावर केंद्रित केले आहे. व्यक्ती चांगली असेल तर कार्य चांगले होणारच.’ ‘संघटित समाजच सर्व प्रकारचे वैभव व सामर्थ्य प्राप्त करू शकतो हे सत्य ओळखून संघाने अध्यात्म ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम प्रारंभ केले.’ संघाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचे मर्म सांगणारी अशी अनेक वाक्ये संघाचे वरिष्ठ प्रचारक माधव विनायक उपाध्य मधुभाई कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या ४८ पानांच्या ‘अथातो संघजिज्ञासा’ या छोटेखानी पुस्तकात ठिकठिकाणी आढळतात.