Timb (टिंब)

अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

निसर्गतः प्राप्त झालेले सुखदायी आयुष्य सोडून दुर्बलांच्या, वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती म्हणजे जणू माणसांमधील देवदूतच. स्वार्थ बाजूला ठेवून समाजातील पीडितांच्या दुःखावर फुंकर घालणारी ही सामान्य माणसेच असामान्य कार्य करून दाखवतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणार्या ‘स्नेहालय’ संस्थेचे डॉ. गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी हे अशाच व्यक्तीपैंकी एक. आपल्या कार्यातून समाजाला सकारात्मकतेच्या ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱ्या या दांपत्याची प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कहाणी ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेघा देशमुख भास्करन लिखित पुस्तकात उलगडली आहे.

 अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम

अक्षत गुप्ता यांच्या “द हिडन हिंदू” त्रयीमध्ये आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम आहे. यामध्ये मुख्य पात्र अमर्यादाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगातली प्रवास कथा उलगडते. गुप्ता यांनी रहस्य, विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत एक विचारप्रवर्तक कथा निर्माण केली आहे हे नक्की!

मिशन सेमीकंडक्टर्स

मिशन सेमीकंडक्टर्स

सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा शोध कसा लागला? निरनिराळे देश यात कसे सामील झाले? इंटेल, ॲपल, हुवावे, सॅमसंग यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांबरोबरच ‘आर्म‌’ सारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपनीची स्थापना कशी झाली? याची रोचक कहाणी डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘मिशन सेमीकंडक्टर्स‌’ या पुस्तकात वाचायला मिळते.

शोध आणि बोध - प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

शोध आणि बोध – प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतुःसूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ. 

 लेखक: रविंद्र अनंत साठे

माझ्या मते माहितीची उपलब्धता हा समाजप्रबोधनाचा महत्वाचा घटक आहे, प्राचीन शेतीविषयक समाजजाणीव, सुसंगत,तपशीलवार माहिती समाजातील जिज्ञासू, विद्यार्थी, शिक्षक,संशोधक व अगदी सर्वसामान्य शेतकरी बंधूंना ह्या पुस्तकाद्वारे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्राचीन शेतीविषयी इतकी सुसंगत, नावीन्यपूर्ण माहिती देणारे मराठी पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्यामुळे मराठी वैज्ञानिक साहित्यात ह्या पुस्तकाद्वारे मोलाची भर पडलेली आहे, असे मला खात्रीने वाटते. –  पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद प्र. मोघे

ारतीय नौका नयनाचा इतिहास

‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ – डॉ. द. रा. केतकर

डॉ. केतकरांनी ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ प्राचीन काळ, मराठा आरमार (मध्ययुगीन कालखंड) आणि ब्रिटिश साम्राज्य काळ (म्हणजेच पेशवाई अस्ताला गेल्यानंतर साधारणपणे १८१८ ते १९४७ स्वातंत्र्य मिळेपर्यंत ) अशा तीन भागात मांडला आहे. सिंदिया स्टीम आणि इतर कंपन्यांसंबंधी विस्तृत माहिती वाचकाला तिसऱ्या भागात मिळते. 

भारतीय नौकानयनाचा स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा समग्र इतिहास या एका ग्रंथात अभ्यासकाला मिळतो. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून याचे मोल जास्त आहे.

अरुण भंडारे 

The Golden Road: How Ancient India Transformed the World

भारताचा सुवर्ण काळ – निळु दामले

The Golden Road: How Ancient India Transformed the World -William Dalrymple (Bloomsbury)

भारताचा इतिहास अनेक इतिहासकार आणि संशोधकानी मांडला आहे. भारतात एकेकाळी वैभव होते हे बहुतेक सर्वानी मान्य केलं आहे. विल्यम डॅलरिंपल तेच या पुस्तकात मांडतात, पण आजवर ठळकपणे न मांडले गेलेले काही पुरावे ते या पुस्तकात वाचकांसमोर ठेवतात.उदा. रोममधे सापडलेले लेखी पुरावे. डॅलरिंपल यांची शैली रंजक आहे हे, नाट्यमय आहे. पण नाट्यमयतेच्या नादी लागून पुराव्यांपासून ते दूर जात नाहीत. थोडक्यात म्हणजे ते कादंबरी किवा नाटक लिहीत नाहीत, इतिहासच लिहितात.

Shopping cart close