Timb (टिंब)

‘लंपन’ची गोष्ट

‘वनवास’- ‘लंपन’ची गोष्ट

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या’ तरी’ त्या ताज्याच वाटतील. 

शाळकरी वयाचा ‘लंपन’ वर्षांनुवर्ष॑ मनात घर करूनबसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या ल॑प्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस – अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं. सत्यकथेत तीस वर्षांपूवी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे, ज्या उत्सुकतेने आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या ल॑पनच्या  ‘कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.

– पु. ल. देशपांडे 

Shopping cart close